तालिबानने उतरविला गुरुद्वारावरील ध्वज; भारताने केला निषेध

तालिबानने उतरविला गुरुद्वारावरील ध्वज; भारताने केला निषेध
Updated on

काबूल : अफगाणिस्तानमधील पक्तीया प्रांतातील चमकानी भागातील गुरुद्वारा थालासाहिबच्या छतावरील पवित्र ध्वज निशान तालिबान्यांनी उतरविले आहे. ‘एएनआय’शी संबंधित नवीन कुमार यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या गुरुद्वारात श्री गुरु नानक देव यांनी भेट दिली होती, असे सांगण्यात येते. याच गुरुद्वारातून गेल्या वर्षी निदान सिंग सचदेव या व्यक्तीचे अपहरण केले होते. अफगाण सरकार आणि शीख समुदायातील मोठ्या नेत्यांच्या प्रयत्नानंतर सचदेव यांची सुटका तालिबानने केली होती.

तालिबानने उतरविला गुरुद्वारावरील ध्वज; भारताने केला निषेध
'Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये मिळेल'
तालिबानने उतरविला गुरुद्वारावरील ध्वज; भारताने केला निषेध
'ट्विटर इंडिया’ने नेमले कायमस्वरूपी अधिकारी; हायकोर्टात माहिती

आम्हाला अनेक माध्यमांच्या बातम्यांमधून अशी माहिती मिळत आहे की, शिख धर्माचा निशाण साहिब या ध्वजाला थालासाहिबच्या गुरुद्वारावरुन हटवण्यात आलं आहे. आम्ही या कृत्याचा निषेध करतो. अफगाणिस्तानचे भविष्य असे असावे जिथे अल्पसंख्याक आणि महिलांसह अफगाण समाजातील सर्व घटकांचे हित सुरक्षित असेल, असं भारताला वाटतं, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अफगान सैन्यामधील संघर्ष भीषण बनला आहे. गेल्या २४ तासांत अफगाणिस्तानमध्ये ३०३ तालिबानी ठार झाले आहेत आणि १२५ पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानुसार नंदरहार, लहमन, गजनी, पक्तिका, कंधार, काबूल, हैरात, जोज्वान, समांगन, फरयाब, सर-ए-पोल, हेलमंद, निमरुज, कुंदुज, बगलान आणि कपिसामध्ये अफगाण सैन्याने मोहीम चालवली होती. याठिकाणी शस्त्रसाठा आणि दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्धवस्त करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.