नरेंद्र मोदी, अरुण जेटली स्टेडीयम ही नावे बदला; काँग्रेसची मागणी

PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या यशानंतर केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे. यामुळे नावबदलामुळे राजकारण तापले आहे. अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने नामांतराला विरोधाऐवजी स्वागताची भूमिका घेतली आहे. मात्र, स्टेडीयमची नावे खेळाडूंच्या नावाने असावी आणि नरेंद्र मोदी स्टेडीयम, अरुण जेटली स्टेडीयम ही नावे बदलावी, अशी मागणीही केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची प्रेरणादायी कामगिरी आणि पुरुषांच्या हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांचा दुष्काळ संपवताना मिळविलेले ब्राँझपदक, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा केली. जनभावनेचा आदर म्हणून या पुरस्काराचे नाव ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विट द्वारे जाहीर केले.

PM-Narendra-Modi
तालिबानने उतरविला गुरुद्वारावरील ध्वज; भारताने केला निषेध

ऑलिम्पिक स्पर्धेमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा दाखला देत पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की देशाला अभिमान वाटणाऱ्या या क्षणात देशवासीयांकडून हा आग्रहदेखील समोर आला आहे की खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जावे. जनभावना लक्षात घेऊन आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केले जात आहे. गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. या निर्णयामुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसच्या ही नेत्यांनी या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. नंतर मात्र काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतपणे नाव बदलाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच, यानिमित्ताने पंतप्रधान मोदींना लक्ष्यही करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या या पुरस्कार नामांतरावर बोलण्याचे टाळले. पक्षाची भूमिका मांडताना सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी, हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्याबद्दल आदर प्रकट करण्याच्या प्रयत्नांचे काँग्रेसतर्फे स्वागत केले. मात्र, मेजर ध्यानचंद यांचे नाव भाजप आणि मोदींनी आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी वापरले नसते तर बरे झाले असते, असा टोला लगावला. ‘राजीव गांधी देशाचे नायक होते आणि राहतील. राजीव गांधी पुरस्कारांनी नव्हे तर आपले हौतात्म्य आणि विचार आणि आधुनिक भारताचे निर्माता म्हणून ओळखले जातात,’ असे सुरजेवाला म्हणाले.

PM-Narendra-Modi
'Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये मिळेल'

क्रीडा क्षेत्राच्या आर्थिक तरतूदीला २३० कोटीची मोदींनी कात्री लावली आणि आता पेगॅसस हेरगिरी, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्द्यांवरून लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. ध्यानचंद यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रात २००२ पासून एक पुरस्कार दिला जात असताना खेलरत्न पुरस्कारालाही त्यांचे नाव दिले. आता स्टेडीयमची नावेही बदलून खेळाडूंची ठेवली जावी. त्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडीयम, अरुण जेटली स्टेडीयम ही नावे बदलावीत.

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस सरचिटणीस

नामांतराबद्दल आश्चर्य वाटले नाही. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलण्यात आले त्याच प्रकारे या पुरस्कारालाही भविष्यात मोदींचे नाव दिले जाईल.

- दिग्विजयसिंह, काँग्रेस नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com