driver
driver 
देश

नववर्षात 311 मद्यपींना बडगा 

सकाळवृत्तसेवा

पणजी :  नववर्ष पूर्वसंध्येच्या रात्री पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सुमारे 311 मद्यपींविरुद्ध कारवाई करताना त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी ही प्रकरणे न्यायालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 
सरत्या वर्षात (2018) पोलिसांनी 5785 वाहन चालकांविरुद्ध मद्यप्राशन केल्याप्रकरणी कारवाई केली त्यातील काहींविरुद्ध दंडात्मक कारवाई तर अति मद्यप्राशन केल्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली होती.

समुद्रकिनारी भागात पोलिसांनी मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करताना उत्तर गोव्यात 119 तर दक्षिण गोव्यात 192 प्रकरणे नोंद झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर म्हणाले की, ज्या वाहन चालकांचे मद्याचे प्रमाण 200 मिलिग्रॅम प्रति 100 मिलिमीटरपेक्षा अधिक आहे त्यांची प्रकरणे न्यायालयात पाठविली जाणार आहेत.

यापूर्वीही पाठविलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने वाहन चालकांना एक दिवस ते दहा दिवसांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मद्यप्राशन केल्याप्रकरणी एका महाराष्ट्रातील पर्यटक  चालकाविरुद्धही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT