Encounter 
देश

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’

सकाळ न्यूज नेटवर्क

तेलंगण पोलिसांची कारवाई; चौघेही चकमकीत ठार
हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा आरोप असलेले चारही आरोपी आज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले. हैदराबादनजीक अत्याचार झालेल्या घटनास्थळी आज सकाळी ही चकमक घडली.

दरम्यान, या चकमकीनंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, काहींनी याचे स्वागत केले; तर काहींनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोपींनी मूळ गुन्हा नेमका कसा केला, याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक या चारही आरोपींना घेऊन हैदराबादनजीकच्या घटनास्थळी गेले होते. तेव्हा हे आरोपी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चारहीजण घटनास्थळीच ठार झाले.. हैदराबाद पोलिसांच्या या एन्काउंटरवर आज देशभरात गल्लीपासून ते दिल्लीतील संसदेपर्यंत सर्वत्र पडसाद उमटले. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पहाटेच घटनास्थळी आणले होते, ज्या ठिकाणी ही चकमक झाली, तो परिसर हैदराबादला लागूनच आहे.

पोलिस अधिकारी गुन्ह्याची तालीम घेत असताना आरोपींनी त्यांची शस्त्रे बळकावित पोलिसांवर गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चारही आरोपी मारले गेले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष चकमकस्थळी दहा पोलिसांची उपस्थिती होती. या चकमकीनंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक मोबाईल आणि दोन शस्त्रेही जप्त केली. या चारही आरोपींनी पशुवैद्यक असणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते, पोलिस चौकशीदरम्यान त्यांनी तशी कबुली दिली होती.

या सर्वांना २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. न्यायालयाने या चारही आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. दरम्यान, पीडित तरुणीचे वडील आणि बहिणीने या चकमकीचे स्वागत करत तेलंगण पोलिसांचे आभार मानले आहेत. दिल्लीतील निर्भयाच्या माता-पित्यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, या चकमकीचे वृत्त समजल्यानंतर लोकांनी तेलंगण पोलिस जिंदाबादच्या घोषणा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. काही महिलांनी मिठाई वाटून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

या चकमकीतील पोलिस अधिकाऱ्यांवर कसल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाऊ नये.
- निर्भयाची आई

हैदराबादेतील पीडितेच्या कुटुंबीयांना सात वर्षे वाट पाहावी लागली नाही. पोलिसांनी आरोपींना मारून योग्यच केले.
- निर्भयाचे वडील

या नराधमांना चकमकीत ठार मारण्यात आल्याचे आम्हाला टीव्हीवरूनच समजले, आम्ही आनंदी आहोत. मी तेलंगण सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत.
- हैदराबादेतील पीडितेचे वडील

हैदराबादेतील बलात्कारी चकमकीमध्ये मारले गेल्याने मी आनंदी आहे. यूपीतील प्रकरणातदेखील दोषींना अशीच शिक्षा द्यायला हवी.
- उन्नावमधील पीडितेचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia Executes Bangladeshis : सौदी अरेबियातील मशिदीत अश्लील कृत्य, बांगलादेशी जोडप्याला फाशी; 'ताझिर' कायद्यांतर्गत शिक्षा

IND vs NZ 1st T20I : संजू सॅमसन-अभिषेक शर्मा सलामीला... श्रेयसने स्पष्ट केलं; न्यूझीलंडला धडकी भरवणारी भारताची Playing XI

Bakra Plant Blooms After 14 Years : 14 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! वाकीघोल पठारावर 'बकरा' वनस्पती बहरली, बघण्यासारखा आहे निसर्गाचा दुर्मिळ नजारा

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Apple चा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनपेक्षा जास्त iPhone खरेदी करता येणार नाहीत; भारत आणि अमेरिकेत नियम लागू

SCROLL FOR NEXT