esakal | उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल एक तासापेक्षा जास्त काळ ही बैठक सुरु होती.  

या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमधील या बैठकीत शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे याचसोबत राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील तर कॉंग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात याठिकाणी हजर होते.  

महत्त्वाची बातमी :  शिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा? मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

या बैठकीत प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जातेय. आज अजित पवार यांना बारामतीतून तातडीने बोलावण्यात आलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत देखील महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.   

गेल्या काळात शिवसेना आणि कॉंग्रेसकडून मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती समोर येत होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून मंत्रिपदाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मंत्रिपदांचं वाटप लवकरात लवकर करायची असल्यास शरद पवार यांच्यासोबत चर्चा होणं महत्त्वाचं होतं. आणि यासंदर्भातील बैठक मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये पार पडली.

हेही वाचा : मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते जरी या बैठकीतून बाहेर पडले असलेत तरीही, राष्ट्रवादीचे नेते अजूनही नेहरू सेंटरमध्येच आहेत. त्यामुळे आता आजच्या या बैठकीनंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा आणि प्रामुख्याने उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार का ? हे कदाचित समजू शकेल. 

Webtitle : important meeting is going between sharad pawar and uddhav thackeray