Bihar crime news
Bihar crime news esakal
देश

कुरकुरे खायला देऊन दलित कुटुंबातील 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

चौधरीनं तरुणीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्यानं सोबत नेलं आणि तिच्यावर..

बिहारमधील गया (Bihar Gaya) येथे एका 8 वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. येथे सरस्वती पूजा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत क्रूरतेची घटना घडली. फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दलित कुटुंबातील आठ वर्षांच्या मुलीवर गावातीलच एका दलित तरुणानं बलात्कार केल्याचं बोललं जातंय. आरोपी तरुणानं गावालगतच्या कोठारात मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली.

पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांची आठ वर्षांची मुलगी सरस्वती पूजा पाहण्यासाठी गेली होती. यावेळी गावातील 20 वर्षाच्या कुंदन चौधरीनं (Kundan Chaudhary) तरुणीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्यानं सोबत नेलं आणि गावालगतच्या निर्जन कोठारात तिच्यावर बलात्कार केला. मुलीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपीनं तिला फूस लावून कुरकरे खायला दिले. त्यानंतर कोठारात नेऊन तिच्यावर या नराधमानं बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी त्या मुलीला तिथंच सोडून पसार झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेचे कुटुंबीय मुलीला घेऊन फतेहपूर पोलिस ठाण्यात (Fatehpur Police Station) पोहोचले आणि त्यांनी चौधरीविरुध्द गुन्हा दाखल केला.

दरम्यान, फतेहपूरच्या एसएचओनं (Fatehpur SHO) महिला एसएचओ रवी रंजना यांना घटनेची माहिती दिलीय. मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळताच, महिला पोलीस ठाण्याचे प्रमुख रवी रंजना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फतेहपूर पोलीस ठाणे गाठले. मुलीची चौकशी केल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. एएसपी स्वीटी सेहरावत, एसडीपीओ घुरन मंडल, फतेहपूरचे एसएचओ राहुल रंजन आणि महिला एसएचओ रवी रंजना हे पीडितेच्या गावी पोहोचले असून पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित मुलीनं सांगितलेल्या घटनास्थळाचा आढावा घेतला. घटनास्थळावरून कुरकुरेचे पाकीटही जप्त करण्यात आलेय. या प्रकरणी महिला पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं महिला एसएचओनं सांगितलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT