Karthyani Amma
Karthyani Amma 
देश

96 वर्षाच्या विद्यार्थिनीने मिळवले 100 पैकी 98 गुण!

वृत्तसंस्था

तिरुअनंतरुपम: शिकण्यासाठी वयाने बंधन नसते, हे केरळमधील एका विद्यार्थिनीने सिद्ध करून दाखविले आहे. कर्त्यायनी अम्मा असे नाव असलेल्या विद्यार्थिनीचे वय अवघे 96 असून त्यांनी राज्यातील साक्षरता परीक्षेत 100 पैकी 98 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.

"अक्षरालक्ष्यम' या केरळमधील साक्षरता मोहिमेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा या आजींनी दिली होती. परीक्षार्थींमध्ये त्या वयाने सर्वांत मोठ्या होत्या. अम्मा यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देण्यात आले. त्याच्या जीवनात त्यांचे हे पहिलेच पारितोषीक आहे.

साक्षरता मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल बुधवारी जाहिर झाला. निकाल झाहीर झाल्यानंतर अम्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. शंभरपैकी गणिताचे दोन गुण गेल्यामुळे अम्मा यांनी खंत व्यक्त केली. अम्मा यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. मात्र, शंभरीच्या काठावर असतानाही शिक्षणाची जिद्द दाखवून देत एक आदर्श ठेवला आहे. दररोज सकाळी त्या एक तासभर अभ्यास करायच्या. अम्मा यांची प्रकृती आजही व्यवस्थित आहे. त्या शाकाहारी असून, कधीही डॉक्टरांकडे गेल्याचे आठवत नसल्याचे सांगतात. दिवसभरामध्ये पाच कप चहा पित असल्याचे त्या सांगतात.

दरम्यान, अम्मा यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याचे जाहिर झाल्यानंतर सोशल मिडीयावर त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. नेटिझन्सनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. अम्मा यांनी शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT