Dhirendra Shastri Yogi Adityanath esakal
देश

Dhirendra Shastri : हिंदू राष्ट्रासाठी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री घेणार CM योगींची भेट; लवकरच भेटीची शक्यता

धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

2 ते 3 दिवसांत दोघांमध्ये भेट होऊ शकते, असं बोललं जात आहे. धीरेंद्र शास्त्रींनी योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

प्रयागराज : हिंदू राष्ट्राचा (Hindu Nation) मुद्दा उपस्थित केल्यानंतर मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) महाराज धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेणार आहेत.

धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत. 2 ते 3 दिवसांत दोघांमध्ये भेट होऊ शकते, असं बोललं जात आहे. धीरेंद्र शास्त्रींनी योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री हे निर्मोही आखाड्याचे महामंडलेश्वर महंत संतोष दास उर्फ ​​सटुआ बाबा यांच्यासह मुख्यमंत्री योगींची भेट घेणार आहेत.

खरंतर धीरेंद्र शास्त्रींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनौपचारिक भेट घ्यायची आहे. या भेटीत ते 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बागेश्वर धाम इथं होणाऱ्या सामूहिक विवाह कार्यक्रमासाठीही त्यांना निमंत्रित करणार आहेत. बागेश्वर बाबा यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी शुक्रवार, 27 जानेवारी रोजी भेटीची वेळ मागितली होती, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं भेट होऊ शकली नाही.

आता 2 फेब्रुवारीला प्रयागराजच्या माघ मेळ्याला धीरेंद्र शास्त्रीही येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी 8:00 वाजता माघ मेळ्याला आल्यानंतर बागेश्वर बाबा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणीत पवित्र स्नान करतील. यादरम्यान ते अनेक संत-महात्म्यांचीही भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT