ASI Report on Gyanvapi
ASI Report on Gyanvapi 
देश

ASI Report on Gyanvapi: ज्ञानवापीच्या ASI रिपोर्टवर भडकले असदुद्दीन ओवैसी; म्हणाले, 'हिंदुत्वाची गुलाम..'

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ज्ञानवापी मशिदी संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा रिपोर्ट समोर आला आहे. यात ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी एक मोठे हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेत संताप व्यक केला आहे.(ASI Report on Gyanvapi up waranasi case marathi news mim chief asaduddin owaisi not happy)

भारतीय पुरातत्व विभाग हे हिंदुत्वाची गुलाम झाली आहे. हा रिपोर्ट केवळ अंदाजावर आधारित आहे. वैज्ञानिक अभ्यासाचा यात अभाव आहे, असं म्हणत ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्ञानवापीच्या परिसरात १७ व्या शतकामध्ये हिंदू मंदिर होते. ते पाडून त्यावर मशीद बांधण्यात आल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर यांना गुरुवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा रिपोर्ट मिळाला आहे. एकूण पाच जणांना हा रिपोर्ट मिळाला आहे. गुरुवारी तो सार्वजनिक करण्यात आला आहे. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे ज्ञानवापी परिसरात मंदिर आणि मशीद एकमेकांना लागून आहेत. मशीद हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षकारांचा आहे.

विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, एएसआयचा ८३९ पानांचा सर्वेक्षण रिपोर्ट गुरुवारी न्यायालयाने संबंधित पक्षकारांना उपलब्ध करुन दिलाय. रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारी जी मशीद आहे, ती सतराव्या शतकात औरंगजेबाने भव्य हिंदू मंदिर उद्धवस्त करुन बांधली आहे. मशिदीमध्ये अद्यापही हिंदू मंदिराचे अवशेष कायम आहेत. मशिदीचे खांब हिंदू मंदिराचे होते.

असा दावा करण्यात आलाय की, मंदिर तोडण्याचा आदेश आणि तारीख फारशी भाषेमध्ये दगडावर नोंदवण्यात आली आहे. याठिकाणी 'महामुक्ती' असं लिहिलेला एक दगड आढळला आहे. मशिदीच्या पश्चिमी दिशेला असलेली भींत ही कधीकाळी हिंदू मंदिराचा भाग होती. दरम्यान, ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणासाठी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पक्षांकडील अकरा लोकांनी कोर्टात याचिका केली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Akola Lok Sabha 2024 Election: अकोल्यात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर, भाजपलाही धक्का

Satara Lok Sabha Result: साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंना दिला दणका! ८६ हजार मतांनी आघाडीवर...

SCROLL FOR NEXT