Gyanvapi case ASI News
Gyanvapi case ASI News

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी होते भव्य हिंदू मंदिर; पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट!

Gyanvapi case ASI News: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हिंदू पक्षकार विष्णु शंकर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Published on

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हिंदू पक्षकार विष्णु शंकर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्ञानवापीच्या ठिकाणी मोठे हिंदू मंदिर होते हे भारतीय पुरातत्व विभागाला आढळल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Varanasi Uttar Pradesh Advocate Vishnu Shankar Jain Hindu side details on the Gyanvapi case ASI )

काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची रिपोर्ट गुरुवारी रात्री सार्वजनिक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ज्ञानवापीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चर भेटले आहे. यावरुन हिंदू पक्षकारांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वेक्षण रिपोर्टमधून सगळं स्पष्ट झालंय. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली आहे. त्यामुळे आता हिंदूंना पूजा-पाठ करण्याची परवानगी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली.

Gyanvapi case ASI News
राम मंदिरानंतर आता अयोध्येत बनणार अशी भव्यदिव्य मशीद

ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचा रिपोर्ट ८३९ पानांचा आहे. पाच लोकांना हा रिपोर्ट देण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. हिंदू पक्षाची बाजू मांडणारे विष्णु जैन यांना देखील रिपोर्ट मिळाला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. एएसआयच्या रिपोर्टनुसार, ज्ञानवापी परिसरात जनार्दन, रुद्र आणि विश्वेश्वराचे शिलालेख मिळाले आहेत. रिपोर्टमध्ये महामुक्ती मंडप असा उल्लेख करण्यात आला आहे. एएसआयनुसार हा एक सबळ पुरावा आहे.

Gyanvapi case ASI News
Ayodhya Ram Temple Satellite Photos: पाच आठवड्यांमध्ये कसं बदललं अयोध्येतील राम मंदिर परिसराचं स्वरुप; पाहा सॅटेलाईट फोटो

एएसआयच्या सर्वेमध्ये एक दगड सापडला जो तुटलेला होता. दाव्यानुसार, १६६९ च्या २ सप्टेंबरला मंदिर पाडण्यात आले होते. जे खांब आधी होते त्याचा वापर मशिदीसाठी करण्यात आला होता. जो तहखाना आहे तेथे हिंदू देव-देवतांच्या मूर्ती होत्या. पश्चिमेकडील भिंत हिंदू मंदिराचा भाग आहे. ते पाहता क्षणी ओळखता येऊ शकते. १७ व्या शतकात मंदिर तोडण्यात आलं होतं. त्यानंतर याचा मशीद म्हणून वापर करण्यात आला होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com