Assam CM Himanta Biswa Sarma esakal
देश

Assam CM : महिलांनी 30 वयापूर्वीच लग्न करावं आणि मुलं जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलंय.

सकाळ डिजिटल टीम

नवजात बालकं आणि गर्भवती महिलांचा मृत्यूदर कमी करण्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. 22 ते 30 वर्षाच्या कालावधीत महिलांनी (Women) योग्य वयात 'आई' बनलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून सध्या वाद सुरु झालाय.

सरमांच्या वक्तव्यामुळं ते नव्या वादात सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांवर आता टीका होऊ लागलीये. गुवाहाटी (Guwahati) इथं एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महिला 22 ते 30 वयोगटात असताना माता बनणं चांगलं आहे. जर महिलांनी असं केलं तर ते केवळ त्यांच्यासाठीच नाही तर मुलासाठी देखील खूप चांगलं होईल. इतकंच नाही तर ज्या महिलांची वये 30 होतील त्या महिलांनी लवकर लग्न करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

नवजात बालकं आणि गर्भवती महिलांचा मृत्यूदर कमी करण्यावर मुख्यमंत्री बोलत होते. या दिशेनं सरकारनं उचललेल्या पावलांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. लवकर लग्न आणि योग्य वयात गर्भवती न होणं हे यामागचं प्रमुख कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्पवयीन मुलांचं लग्न लावणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. मी महिलांना सांगू इच्छितो की 30 वर्षांच्या आधी आई व्हा, त्यानंतर महिलांना समस्यांना सामोरं जावं लागतं, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

CM हिमंता पुढं म्हणाले, तरुण वयात महिला माता बनल्याबद्दल सतत चर्चा होत असते. देवानं हे शरीर अशा प्रकारे बनवलं आहे की, प्रत्येक गोष्टीचं योग्य वय आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळानं निर्णय घेतला होता की, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्या पुरुषांवर POCSO कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. 14-18 वयोगटातील मुलींशी विवाह करणाऱ्या पुरुषांवर बालविवाह कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT