Shiv Sena : CM च्या मुलाची चिंता करु नका, तुमच्यात खरंच हिंमत असेल तर..; शंभूराज देसाईंचं राऊतांना थेट आव्हान

'संजय राऊतांच्या (Sanjay Raut) विधानाकडे आम्ही कधीच गांभीर्याने पाहात नाही. गांभीर्याने घेण्यासारखे त्यांचे वक्तव्य नसतेच.'
Shambhuraj Desai vs Sanjay Raut
Shambhuraj Desai vs Sanjay Rautesakal

सातारा : संजय राऊत हे कधीच लोकांतून निवडून आलेले नाहीत. डॉ. श्रीकांत शिंदेची चिंता करण्यापेक्षा त्यांनी आमच्या आमदारांच्या मतांवर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि राज्यसभेवर पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे आव्हान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार राऊत यांना दिले आहे.

Summary

'डॉ. श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) खासदारकीची चिंता करू नये. राऊत कधीच लोकांतून निवडून आलेले नाहीत.'

संजय राऊतांनी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले. देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, 'संजय राऊतांच्या (Sanjay Raut) विधानाकडे आम्ही कधीच गांभीर्याने पाहात नाही. गांभीर्याने घेण्यासारखे त्यांचे वक्तव्य नसतेच. त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) खासदारकीची चिंता करू नये. राऊत कधीच लोकांतून निवडून आलेले नाहीत. नगरपालिका, विधानसभा, खासदारकीलाही ते निवडून आलेले नाहीत. ते राज्यसभेतून खासदार झाले आहेत.'

Shambhuraj Desai vs Sanjay Raut
राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न! काँग्रेस अध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना पत्र; खर्गे म्हणाले, मी तुमचा..

सहा महिन्यांपूर्वी आमच्या आमदारांच्या मतांवर ते खासदार झाले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा व राज्यसभेवर निवडून येऊन दाखवावे. आमदारांची मर्यादित मते असतात. तुम्ही स्वत:ला राष्ट्रीय नेते समजता खूप मोठे राष्ट्रीय प्रवक्ते आहात. आमच्या कल्याणच्या जागेची चिंता करू नका. आमच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारकीचा राजीनामा द्या व परत निवडून येऊन दाखवा, असं आव्हान देसाईंनी राऊतांना दिलंय.

Shambhuraj Desai vs Sanjay Raut
Tripura Election : विधानसभेची पहिली यादी जाहीर; भाजपनं मुस्लिमांनाही दिलं तिकीट, 11 महिलांचा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com