Sarayu River Dipotsav
Sarayu River Dipotsav Sakal
देश

Ayodhya Sarayu River : शरयू झाली राममय...

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या बाललीलांपासून आयुष्यातील सर्व घटनांची साक्षीदार असलेली शरयू आज अत्यंत ममत्त्वाने वाहत होती. तिच्याही प्रवाहात प्रभू रामचंद्रांबद्दलची उदात्त भावना जाणवत होती. आज प्रत्यक्ष रामलल्ला हक्काच्या घरात विराजमान होत असताना प्रत्यक्ष शरयूही गदगदली.

नेहमी शांतपणे वाहणारी शरयू आज त्यामुळे विशेष ममत्त्वाने, आत्मीयतेने वाहत होती. तिच्या प्रवाहातील बदल खूप काही सांगणारा होता. पाण्यालाही स्वभाव, भावना असतात याची प्रचिती शरयूच्या गुप्तद्वार, कैकयी, कौसल्या, पापमोचन, लक्ष्मण, झुनकी आणि ‘नया घाट’वर येत होती. या सर्व घाटांच्या दोन्ही बाजूंना लाखोंच्या संख्येने भाविक कंठात प्राण आणून उभे होते. मानस सरोवरावर बाणांचा प्रहार करून वैवस्वत महाराजांनी त्याला वाट करून दिली. तोच प्रवाह शरयू नदी म्हणून ओळखला जातो, अशी अयोध्येतील नागरिकांची भावना आहे.

गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानस शरयू नदीचे वर्णन केले आहे. ग. दि. माडगूळकरांनी गीतरामायणात शरयू तिरावरची अयोध्या असा उल्लेख केला आहे. अयोध्या शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या शरयू नदीचे घाटावर सुंदर असे मंदिर आहे. दररोज सायंकाळी सहा वाजता शरयू नदीची महाआरती केली जाते. आजच्या आरतीसाठी शरयू अधीर झाली होती.

प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील सर्व घटनांची एकमेव साक्षीदार असलेल्या शरयू नदीने राम जन्मभूमी मुक्तीचा शेकडो वर्षांचा संघर्षही अनुभवला आहे. त्यामुळे तिच्या मनात आज अपरंपार भाव, प्रभू रामचंद्राप्रती विशेष ममत्त्व जाणवत होते. शरयू तीरावर सायंकाळी झालेल्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगभरात श्रीरामाचा जयघोष

वॉशिंग्टन - अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवरून जगभरातील बहुतांश मंदिरात उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेसह आशिया, युरोपीय देशांतील मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनिवासी भारतीय नागरिकांनी सुमारे चाळीस देशांत स्थानिक वेळेनुसार प्राणप्रतिष्ठेनिमित्त आनंदोत्सव साजरा केला. न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे भारतीय नागरिकांनी गर्दी केली हा संपूर्ण परिसर रामगीत ऐकत बेभान झाला होता.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्याची पद्धत अनोखी आणि आधुनिक पाहवयास मिळाली. टाइम स्क्वेअर येथील भव्य पडद्यावर श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले आणि या चित्राकडे पाहत हातातील भगवे झेंडे उंचावत नागरिकांनी घोषणा दिल्या. यादरम्यान टाइम्स स्क्वेअर येथे ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिराच्या सदस्यांनी लाडू वाटप केले.

टाइम्स स्क्वेअर येथे काही बिलबोर्ड हे श्रीरामाचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसीचे उपनगर व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स कौंटीत एसव्ही लोटस मंदिरात शीख, मुस्लिम आणि पाकिस्तानी अमेरिकी समुदायाचे नागरिक सहभागी झाले. हा सर्व समुदायासाठी आनंदाचा क्षण असून एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेतील शीख नागरिक जस्सी सिंग यांनी हा खूप आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शीख समुदायाकडून आणि अमेरिकेतील शिखांकडून भारतात श्रीराम मंदिराच्या अनावरणानिमित्त हिंदू बंधू आणि भगिनींना खूप शुभेच्छा. अमेरिकेतील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन हा आजचा आनंदाचा आणि पवित्र दिवस साजरा करत आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT