देश

अप्पासाहेबांची चक्क वानरांशी मैत्री

गजानन पाटील

बेडकिहाळ - सध्याच्या आधुनिक युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. शिवाय आई, वडिलांनाही स्वतःजवळ ठेवून घेण्याचे दिवस संपले आहेत. पशु, पक्षी आणि प्राण्यांवरील भूतदयाही नष्ट होऊ लागली आहे. अशा युगात येथील अप्पासाहेब कोन्नुरे यांनी दोन वर्षापासून चक्क वानरांशी मैत्री करून त्यांना दररोज खाऊ घालण्याचा उपक्रम रोबविला आहे. एरव्ही माणसांजवळ न येणारी ही वानरे आता अप्पासाहेब कोन्नुरे यांच्या सभोवती घिरट्या घालताना दिसत आहे. त्यांच्या या अनोख्या मैत्रीची बेडकिहाळसह परिसरात चर्चा रंगली आहे.

बेडकिहाळ येथे सतत वानरांचा वावर असतो. काही वानरे उपद्रव देत असल्याने त्यांना हाकलण्यात येते. पण कोन्नुरे यांनी वानरांशी मैत्री करून ग्रामस्थांना भूतदयेचा संदेश दिला आहे. दोन वर्षापूर्वी वानराला शेंगदाणे खायला दिले. त्यानंतर ते वानर पुन्हा आल्यावर खाऊ दिला. त्यानंतर हळुहळु वानरांची संख्या वाढू लागल्याने कोन्नुरे यांनी खूपच लळा लावला आहे.

सुरुवातीच्या काळात येणारी एक-दोन वानरे आता टोळक्‍याने त्यांच्या भोवती फिरू लागली आहेत. दररोज त्यांना खाऊ घालण्याचा उपक्रम राबविला जात आहे. 

अप्पासाहेब कोन्नुरे हे गावातून फिरत असताना केवळ त्यांचा आवाज ऐकून वानर भर रस्त्यात त्यांच्या भोवती गराडा घालतात. वानरांवर त्यांनी केलेले प्रेम हेच त्यांना भावल्याचे दिसून येत आहे. सध्या वानरांची टोळी कोन्नुरे यांच्या गल्लीतच वास्तव्यास आहे. बऱ्याच दिवसापासून झालेल्या या मैत्रीमुळे वानरे आता लहान मुलामध्येही मिसळू लागली आहेत. त्यामुळे या वानरांचा धोका कमी होऊन ग्रामस्थांची मैत्री होताना दिसत आहे. 

वानरांना खाद्य मिळत नसल्याने त्यांचा धुडकूस गावभर सुरु होता. आपण खाऊ पुरविल्यापासून ते संयमाने गावातच वास्तव्यास आहेत. शिवाय त्यांचा उपद्रवही कमी झाला आहे. प्रत्येकाने प्राणीमात्रांवर दया करून त्यांच्याशी मैत्री केल्यास खऱ्या अर्थाने समाधान मिळेल.
- अप्पासाहेब कोन्नुरे,
बेडकिहाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT