Nishatpura Crime News
Nishatpura Crime News esakal
देश

Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

सकाळ डिजिटल टीम

आरोपीनं मोबाईलवर चित्रपट दाखवण्याच्या बहाण्यानं मुलीला जवळच्या धर्मशाळेच्या टेरेसवर नेलं आणि तिथं..

भोपाळ : राजधानीच्या निशातपुरा भागात सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीये. आरोपी हा तिचा शेजारी असून, त्यानं नवीन मोबाईलवर चित्रपट दाखवण्याच्या बहाण्यानं मुलीला जुन्या धर्मशाळेच्या टेरेसवर नेलं आणि तिथं तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं.

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी भागवत विश्वकर्माला अटक केलीये. निशातपुरा पोलिस स्टेशनचे (Nishatpura Police Station) प्रभारी रुपेश दुबे यांनी सांगितलं की, मुलगी भानपूर भागात तिच्या नातेवाईकांसोबत राहते. तरुणी तिच्या घराजवळ राहणारा आरोपी भागवत विश्वकर्माला ओळखत होती. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही मुलगी घराजवळ खेळत होती. याचवेळी आरोपी भागवत विश्वकर्मा तिच्याकडं आला आणि त्यानं त्याचा नवीन मोबाइल मुलीला दाखवू लागला.

भागवतनं तरुणीला सांगितलं की, माझ्या मोबाईलवर नवीन चित्रपट येतात. तरुणीनं त्याला मोबाईल दाखवण्याचा आग्रह केला असता, आरोपीनं मोबाईलवर चित्रपट दाखवण्याच्या बहाण्यानं तिला जवळच्या धर्मशाळेच्या टेरेसवर नेलं. तिथं त्यानं अश्लील कृत्य करून मुलीचे कपडे काढून तिच्याशी गैरवर्तन केलं.

त्याचवेळी मुलीसोबत खेळणारी मुलं तिच्या शोधात धर्मशाळेच्या छतावर पोहोचली. मुलांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मुलीनं घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीची आई तिला घेऊन निशातपुरा पोलिस ठाण्यात गेली आणि आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT