शिमल्यात नववर्ष साजरं करण्यासाठी जाणाऱ्या मित्रांच्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जखमी I Road Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Accident in Ambala

टक्कर इतकी वेगवान होती की, कार पुढं जात असलेल्या डंपरमध्ये घुसली.

Road Accident : शिमल्यात नववर्ष साजरं करण्यासाठी जाणाऱ्या मित्रांच्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जखमी

Road Accident in Ambala : गुरुग्रामला नवीन वर्ष साजरं करण्यासाठी जाणाऱ्या मित्रांच्या गाडीला हिमाचल प्रदेशातील शिमला (Himachal Pradesh Shimla) इथं अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

दीपक असं मृताचं नाव असून, त्याचे साथीदार चिराग, तुषार, प्रकाश आणि ऋतिक हे जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या तुषारवर उपचार सुरू असून प्रकाश आणि ऋतिक यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा: Narendra Modi : PM मोदींच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हाही ते..; VHP नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण

या प्रकरणी तुषारच्या फिर्यादीवरून पडाव पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण शुक्रवारी दुपारी चार वाजता कारमधून निघाले. अंबाला दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (Delhi National Highway) पडाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुष्ठरोग आश्रमाजवळ रात्री 9 वाजताच्या सुमारास एका ट्रकनं त्यांच्या कारला मागून धडक दिली. टक्कर इतकी वेगवान होती की, कार पुढं जात असलेल्या डंपरमध्ये घुसली. या अपघातात दीपकचा मृत्यू झाला, तर 4 मित्र जखमी झाले आहेत.

हेही वाचा: Amit Shah : भारताच्या एक इंचही जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस कोणाच्यात नाही; अमित शाहांचा थेट चीनला इशारा