edible-oil  sakal media
देश

Edible Oil: दिलासा! खाद्य तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता चांगलीच होरपळून निघाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता चांगलीच होरपळून निघाली आहे. यामध्ये खाद्य तेल, स्वयंपाकाचा गॅस, डाळी, पेट्रोल-डिझेल या जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. पण आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

कारण खाद्या तेलांवरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. (Big Relief to Edible oil will become cheaper Central govt has taken a big decision)

सरकारनं रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सुर्यफूल तेलावर आयात शुल्क १७.५ टक्क्यांनी घटवून १२.५ टक्के केलं आहे. आजपासूनच (१५ जून) हा बदल लागू होणार आहे. त्याचबरोबर आता सर्व प्रकारचे कच्चे तेल म्हणजेच कच्चे पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावर ५ टक्के आयात शुल्क लागेल म्हणजेच एकूण ५.५ टक्के कर लागेल.

रिफाइंड खाद्य तेलाच्या प्रकरणात प्रभावी आयात शुल्क १३.७५ टक्के, रिफाईंड तेलावर १२.५ टक्के आयात शुल्क आणि या आयात शुल्कावर १० टक्के उपकर लागणार आहे. (Latest Marathi News)

सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीवी मेहता यांनी मिंटशी बोलताना सांगितलं की, "खाद्य तेलाच्या किंमतींना नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कच्चे आणि रिफाइंड सोयाबिन तेल, सुर्यफूल तेल यांमध्ये कमीत शुल्क असल्यानं रिफाईंड सोयाबिन तेल आणि सुर्यफूल तेल आयात करणं हे व्यावसायिक रुपानं व्यवहार्य नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT