uma bharti
uma bharti 
देश

राम मंदिरावर भाजपची मक्तेदारी नाहीः उमा भारती

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः प्रभू रामचंद्र हे सर्वांचे असन, मंदिर उभे रहावे असेच सर्वांना वाटते. राम मंदिरावर फक्त भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी नाही, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला होता. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारला दिले होते. या पार्श्वभूमीवर उमा भारती या होशंगाबाद येथे प्रचारसभेसाठी आल्या होत्या. त्यांना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा.'

प्रसारमाध्यमांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या, 'समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवैसी, आझम खान व सर्वांना पुढे येऊन राम मंदिर उभे राहण्यासाठी पाठींबा देण्याची विनंती करते. राम मंदिर उभे रहावे, हे माझे स्वप्न आहे. राम मंदिरावर भाजपची मक्तेदारी नाही. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलासह अन्य पक्षांनीही साथ द्यावी.'

‘अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. त्यामुळे रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करणे अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कठीण होते. परंतु आता केंद्रात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे कायदा करा किंवा अध्यादेश काढा, शिवसेना पाठिंबा देईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT