देश

भाजप खासदाराने आमदाराला बुटाने मारले (व्हिडिओ पहा)

सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'मेरा बुथ सबसे मजबूत' हा कानमंत्र दिला. पण उत्तरप्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफाडत 'मेरा बुट सबसे मजबूत'..! असा संदेश दिला. संत कबीर नगर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. चालू बैठकीत खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने मारहाण करण्यात सुरवात केल्याने सगळेच चक्रावले. यानंतर सिंह उठले आणि त्यांनीही त्रिपाठी यांना मारण्यास सुरवात केली.
 


पोलिसांनी मध्यस्थी करून भांडणे थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु, दोघेही ऐकायला तयार नव्हते. यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार मारमारी झाली. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. या नेत्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जिल्हा नियोजन बैठकीच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या विकासकार्यांची माहिती देणाऱ्या शिलान्यासात नाव न टाकल्याच्या वादातून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, काही काळानंतर त्याचे रुपांतर थेट बुटाने हाणामारीत झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT