Prashant Kishor : भाजप देशात ‘तीनशे पार’ होणार; प्रशांत किशोर यांचा अंदाज
Prashant Kishor esakal
देश

Prashant Kishor : भाजप देशात ‘तीनशे पार’ होणार; प्रशांत किशोर यांचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशेच्या वर जागा मिळून हाच पक्ष सत्तेत येईल, असा अंदाज प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण भारत या फारसे अस्तित्वच नसलेल्या दोन भागांमध्येही भाजपला जागा मिळतील, असा होराही त्यांनी व्यक्त केला आहे.

सुरुवातीला भाजप आणि नंतर भाजपविरोधातील पक्षांसाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केलेल्या प्रशांत किशोर यांच्याशी ‘पीटीआय’ने संवाद साधला. ते म्हणाले,‘‘भाजपचे वर्चस्व कायम असले तरी हा पक्ष अजिंक्य नाही. गेल्या काही काळात भाजपला रोखण्याच्या तीन मोठ्या संधी विरोधकांना मिळाल्या होत्या. मात्र, आळशीपणा आणि दिशाहीन धोरण यामुळे त्यांनी त्या संधी गमावल्या.’’

तेलंगण, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळ या सात राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या २०४ जागा आहेत. यापैकी भाजपला २०१४ मध्ये केवळ २९ आणि २०१९ मध्ये ४७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र ही संख्या वाढण्याचा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. जागा वाढणार असल्या तरी भाजपने एकट्याने ३७० जागा जिंकण्याबाबत व्यक्त केलेला विश्‍वास अवास्तव असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

भाजपचा प्रभाव असलेल्या उत्तर आणि पश्‍चिम भारतात त्यांना किमान शंभर जागांवर फटका बसेल, इतकी चांगली लढत विरोधकांनी व विशेषत: काँग्रेसने दिली, तर भाजपचा गड ढासळू शकतो,’ असे सांगतानाच प्रशांत किशोर यांनी, असे काही होण्याची चिन्हे नाहीत, असेही स्पष्टपणे सांगितले.

लढत उत्तरेत, मुद्दा मणिपूरचा

भाजपला ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात कर्नाटकचा अपवाद वगळता आतापर्यंत यश मिळालेले नाही. प्रशांत किशोर म्हणाले,‘‘मागील काही वर्षांत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या दोन्ही विभागांमध्ये वारंवार दौरे केल्याने त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. विरोधकांची भाजपबरोबर खरी लढत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये आहे. मात्र ते मणिपूरचा मुद्दा अजेंड्यावर आणतात. मग मते कशी मिळणार? विरोधकांना भाजपची शक्ती असलेल्या राज्यांमध्ये यश मिळाले नाही तर वायनाडमध्ये राहुल गांधी जिंकले तरी काहीच फरक पडणार नाही. हिंदी पट्टा जिंकल्याशिवाय देशावर राज्य करता येणार नाही हे मोदींनी ओळखले, म्हणूनच ते वाराणसीतून लढतात.’’

‘राहुल यांनी बाजूला व्हावे’

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्यास राहुल गांधी यांनी पक्षातील स्वत:चे महत्त्व कमी करावे, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘वास्तवात राहुल हेच काँग्रेस पक्ष चालवत आहेत. मागील दहा वर्षांत पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी पक्षाची सूत्रे अप्रत्यक्षपणे आपल्याच हाती ठेवली आहेत. त्यांची ही भूमिकाही लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळेच त्यांनी आता बाजूला व्हावे.’’ आपल्यात काय कमतरता आहे हे ओळखून त्या दूर करणे, हेच चांगल्या नेत्याचे लक्षण आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

किशोर यांचे भाजपबाबतचे अंदाज

तेलंगणमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर

ओडिशामध्ये खात्रीने सर्वाधिक जागा

पश्‍चिम बंगालमध्येही पहिले स्थान मिळविणार

तमिळनाडूमध्ये मतांची टक्केवारी वाढणार

प्रशांत किशोर म्हणाले

आंध्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन

विरोधकांमधील विसंवादाचा भाजपला फायदा

काँग्रेसची अधोगती १९८४ पासूनच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : पुढील ३ तासांत 'या' जिलह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT