Dhule Crime News : लूटमार करणाऱ्या‍ टोळीचा पर्दाफाश; आझादनगर पोलिसांकडून मुद्देमाल जप्तीसह संशयित दोघांना अटक

Dhule Crime : शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीचा आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. यात दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Police officers and staff present during the interrogation of the suspects along with the confiscated items from the looting gang.
Police officers and staff present during the interrogation of the suspects along with the confiscated items from the looting gang.esakal

Dhule Crime : शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीचा आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. यात दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. जुने धुळ्यातील ज्ञानेश्वर वामन माळी २६ मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळील सर्व्हिस रोडलगत मालकीचा ट्रक धुण्यासाठी थांबले होते. (Dhule Crime Robbery gang busted)

तेव्हा दुचाकीवरील दोघांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील आठ हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी शुक्रवारी आझादनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला. तक्रारदार माळी यांनी चोरट्यांच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे, तसेच यापूर्वी वरखेडी फाटा येथे चोरीच्या घडलेल्या घटनांचा पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार व शोध पथकाने आढावा घेतला.

त्यानुसार गुन्हेगार सराईत असल्याने रोज वरखेडी फाटा व महामार्ग उड्डाणपुलावर गस्त सुरू केली. त्यात अर्शद शाह लियाकत शाह (रा. काझीचे शेत, नटराज टॉकीजजवळ, धुळे) व त्याचा साथीदारांनी गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस पथकाने अर्शद शाह यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा साथीदार अरबाश शाह सुबराती शाह (रा. काझी प्लॉट, धुळे) याच्यासह केल्याची कबुली देत लुटीतील आठ हजारांचा मोबाईल काढून दिला. तसेच अर्शद शाह याने पोलिस कोठडीत साथीदार अब्दुल फरहान अब्दुल खालिद (रा. वडजाई रोड, धुळे) व अरबाश शाह सुबराती शाह याच्यासह मोहाडी पोलिस ठाणे हद्दीत रानमळा रोड, पाटीलवाडा हॉटेल.

Police officers and staff present during the interrogation of the suspects along with the confiscated items from the looting gang.
Crime News: वाशीतील सुदामा सोसायटीतील स्लॅब कोसळल्या प्रकरणी फ्लॅट मालक व कॉन्ट्रक्टरवर गुन्हा दाखल!

तसेच रेसीडेन्सी हॉटेलजवळ दोन दुचाकी, ६० हजारांची रोकड व मोबाईल लुटल्याची कबुली दिली. अर्शद शाह याने साथीदारांसह मोहाडी पोलिस ठाणे हद्दीत पूर्वी केलेल्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याचा साथीदार अब्दुल फरहान अब्दुल खालिद याला अटक करण्यात आली.

संशयित दोघांकडून आठ हजारांचा मोबाईल, एमएच १८, एजे ९३५३ आणि एमएच १८, बीक्यू ९१४८ क्रमांकाची दुचाकी, चॉपर जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार.

मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील व पथकातील पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, हवालदार योगेश शिरसाट, गौतम सपकाळे, शांतिलाल सोनवणे, संदीप कढरे, अनिल शिंपी, अझरुद्दीन शेख, पंकज जोंधळे, मकसूद पठाण यांनी केली.

Police officers and staff present during the interrogation of the suspects along with the confiscated items from the looting gang.
Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com