Akhilesh Yadav
Akhilesh Yadav esakal
देश

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांच्यामागे CBI चौकशी; 'या' प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता

संतोष कानडे

Samajwadi Party : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना सीबीआयने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. अखिलेश यांना साक्षीदार म्हणून २९ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. मुख्यमंत्री पदावर असताना अवैध उत्खनन प्रकरणी ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अखिलेश यादव हे मागच्या काही दिवसांपासून सीबीआय आणि ईडीबाबत भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत. निवडणुकीच्या काळात सरकार सीबीआय आणि ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत असल्याचा घणाघात ते करत असतात. त्यातच आता सीबीआयच्या समन्सवरूनही यूपीचे राजकारण तापणार आहे.

अखिलेश यादव यांना समन्स बजावण्यावरुन समाजवादी पक्ष आक्रमक भूमिका स्वीकारू शकतो. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव गुरुवारी सीबीआयच्या चौकशीसाठी हजर राहणार नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

2012-13 मध्ये अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना गौण खनिज खाते अखिलेश यादव यांच्याकडे होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. 2016 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. त्यात माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव पुढे आले होते.

इतकेच नाही तर अखिलेश यादव सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या डीएम राहिलेल्या बी चंद्रकला यांनाही आरोपी करण्यात आले आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही छापेमारीही करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT