Online Shopping sakal
देश

Centre Issues Order: 'ती' गोष्ट ऑनलाइन विकल्यामुळे Flipkart-Amazon सह 5 ई-कॉमर्स वेबसाइटवर कडक कारवाई

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

राहुल शेळके

Centre Issues Order: मोटारीच्या चालकाने व शेजारील सहप्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास मोटारीत वाजणारा अलार्म बंद करण्यासाठी वापरण्याच्या उपकरणाची जाहिरात आणि विक्री केल्याबद्दल केंद्र सरकारने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, स्नॅपडील व शॉपक्यूज या पाच बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना त्या उपकरणांची विक्री आणि जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे.

मात्र याची विक्री अजूनही चालु होती. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अशा उपकरणांची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. केंद्राच्या आदेशानंतर अशा एकूण 13,118 जाहिराती मागे घेण्यात आल्या, त्यातील सुमारे आठहजार ॲमेझॉनच्या तर फ्लिपकार्टच्या चार ते पाच हजार जाहिराती विविध ठिकाणी होत्या.

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्यामुळे आणि कार प्रवाशांच्या जीवनाशी तडजोड केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये Amazon, Flipkart, Meesho, Snapdeal आणि Shoplcues यांचा समावेश आहे.

वाहनांमधील सर्व प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, सरकार वाहन उत्पादकांना मागील सीटसाठी सीट बेल्ट अलार्म सिस्टम अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तसेच मागच्या सीटवरही असा अलार्म लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

सरकारने निर्णय का घेतला?

खरं तर, कार कंपन्यांनी हा अलार्म विकसित केला होता जेणेकरून सीट बेल्ट लावला नसेल तर कारच्या आत अलार्म वाजतो आणि प्रवासी आणि ड्रायव्हर सावध होतात. बरेचदा लोक घराभोवती फिरताना सीट बेल्ट लावणे त्रासदायक मानतात आणि अलार्म बंद ठेवण्यासाठी अशा मेटल क्लिपचा वापर करतात.

जेणेकरून वाहन चालवताना प्रवासी किंवा चालकाने बेल्ट घातला नसला तरीही अलार्म बंद राहतो. मात्र, अशा प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. कारण अनेकवेळा प्रवासी महामार्गावरून बाहेर पडताना सीट बेल्ट लावायला विसरतात.

आणि या क्लिपमुळे त्याला पूर्वसूचनाही मिळत नाही. आणि अतिवेगाने झालेला अपघात वाहनचालकांसाठी सीट बेल्ट न लावता जीवघेणा ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT