money
money 
देश

भारतात चीनकडून 1000 कोटींचं मनी लाँड्रिंग; आयकर विभागाची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आयकर विभागाने काही चीनी (China) नागरिक आणि त्यांच्या भारतातील सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापा टाकला. विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. काही चीनी लोक भारतात त्यांच्या सहकाऱ्यांसह मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांचे काम करत होते असं समोर आलं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने कारवाई करत मोठं रॅकेट उघडकीस आणलं आहे. 

चीनी नागरिक, भारतातील त्यांचे सहकारी, चायनिज कंपन्या आणि काही बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. आयकर विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यामधून बनावट कंपन्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर हवाला व्यवहार केले जात असल्याचं समोर आलं आहे. 

छाप्यात 40 बनावट बँक खाती उघडल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. ही 40 बनावट खाती चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून उघडण्यात आली होती. तसंच या खात्यांवर जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं समजतं. 

चीनी कंपन्यांच्या सबसिडिअरी कंपन्या आणि इतर लोकांनी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आलेल्या कंपन्यांमधून भारतात खोट्या व्यवसायाच्या नावाखाली जवळपास हजार कोटींचा अॅडव्हान्स घेतला आहे. याच पैशातून हवाला व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या कामामध्ये अनेक बँकांचे कर्मचारी आणि चार्टर्ड अकाउंटंट सहभागी असल्याचं आढळलं आहे. हवाल्याच्या व्यवसायात अमेरिकन डॉलर आणि हाँगकाँगमध्ये व्यवहार करण्यात आल्याचं दिसतं. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT