Cash Scam Congress MLA esakal
देश

Congress MLA : 'या' तीन काँग्रेस नेत्यांची आमदारकी धोक्यात; सभापतींनी बजावली नोटीस

आमदारांना 1 सप्टेंबरपर्यंत मेल किंवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलंय.

सकाळ डिजिटल टीम

आमदारांना 1 सप्टेंबरपर्यंत मेल किंवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलंय.

कॅश घोटाळ्याप्रकरणी (Cash Scam) काँग्रेसमधून (Congress MLA) निलंबित करण्यात आलेल्या डॉ. इरफान अन्सारी, नमन विक्सल कोंगाडी आणि राजेश कच्छप या तीन आमदारांना विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो यांनी नोटीस बजावलीय. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम (Alamgir Alam Jharkhand) यांनी तिघांचीही आमदारकी रद्द करण्याच्या शिफारसीवरून ही नोटीस पाठवण्यात आलीय. त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत मेल किंवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलंय.

या तिघांनाही कोलकात्यातच नोटिसा मिळाल्या आहेत. आलम यांनी आपल्या तक्रार पत्रात म्हटलंय की, या तिघांनी इतर तीन आमदार कुमार जयमंगल, भूषण बाडा आणि शिल्पी नेहा टिर्की यांना सरकार पाडण्यासाठी ऑफर दिली होती. त्यासाठी मंत्रिपद आणि 10-10 कोटी देऊ केलं होतं. याबाबत या आमदारांनी लेखी तक्रार केलीय.

त्याआधारे डॉ. इरफान, नमन विक्सल व राजेश यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी. मात्र, या तीन निलंबित आमदारांनी नोटीस देण्यात आलेला आरोप चुकीचा असल्याचं म्हटलंय. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही निराधार असल्याचं सांगितलंय. हे तिघंही 1 सप्टेंबर रोजी सभापतींना उत्तर देणार असल्याचं कळतंय. या तिन्ही आमदारांनी शुक्रवारी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडं नोटीसचं उत्तर पाठवलंय. यासोबतच काँग्रेसचे झारखंड प्रभारी, संघटना प्रभारी आणि विधिमंडळ पक्षाचे नेते यांनाही उत्तर पाठवण्यात आलंय. त्यांना कोलकाता इथं 48 लाख रुपयांसह अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT