देश

Loksabha 2019 : 'बहुमत कोणालाच नाही; काँग्रेस आघाडीचे सरकार होईल स्थापन'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीच सक्षम सरकार स्थापन करेल, असा दावा आज कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे आताच सांगू शकत नाही; मात्र, सध्याचे वातावरण भाजप सरकारच्या विरोधात आहे, हे खरे, असे शिंदे म्हणाले. 

देशात कॉंग्रेस आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज आहे. आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल, असे त्यांनी नमूद केले गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांची अन्यायकारक राजवट देशाने अनुभवली असून, भाजप आघाडी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जनता वाट पाहत आहे. निकालात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मग भाजप असो किंवा कॉंग्रेस पक्ष असो. त्यामुळे आगामी सरकार आघाडीचेच असणार आहे आणि देशात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असेच चित्र राहिलेले आहे.

निवडणूक प्रचारात भाजप विकासासंदर्भात कोणत्याच मुद्यावर बोलावयास तयार नाही. केवळ राष्ट्रवादाचे मुद्दे काढून मूळ विषयांना बगल दिली जात आहे. भाजप आघाडी सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाबद्दल चकार शब्द काढत नाही. तुम्ही जर भाजपचा कार्यकर्ता किंवा भाजपच्या खासदाराकडे विचारणा केली तर त्यांनाही "अच्छे दिन' आलेले नाहीत, हे लक्षात येईल. मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेला उल्लेख खेदजनक असल्याचेही शिंदे म्हणाले.

मोदींच्या वक्तव्यामुळे अनेकांची मने दुखावली असून, एवढ्या उच्चस्थानावर बसलेल्या व्यक्तीने तितक्‍याच ताकदीच्या व्यक्तीबद्दल बोलणे अयोग्य आहे. भाजपच्या राजकारणाची पातळी खालावलेली दिसून येते, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधानपदाबाबत बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, मात्र अंतिम निर्णय यूपीएचे खासदार घेतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT