Consolation to Arvind Kejriwal and Manish Sisodia Consolation to Arvind Kejriwal and Manish Sisodia
देश

केजरीवाल व सिसोदिया यांना दिलासा; अंशू प्रकाश यांना कोर्टाचा धक्का

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्य सचिव अंशू प्रकाश (Anshu Prakash) यांच्या कथित मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. अंशू प्रकाश यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना दोषमुक्त करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विशेष खासदार/आमदार न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (Consolation to Arvind Kejriwal and Manish Sisodia)

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी माजी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांची याचिका (petition) फेटाळून लावली. अंशू प्रकाश (Anshu Prakash) यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली (rejected). दिल्लीचे माजी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी या प्रकरणात सर्वांना दोषमुक्त करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अर्ज दाखल केला होता.

हा फौजदारी खटला १९ फेब्रुवारी २०१८ रोजी केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान अंशू प्रकाश यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित आहे. या प्रकरणात अनेक राजकारण्यांनाही आरोपी करण्यात आले होते.

न्यायालयाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), मनीष सिसोदिया (Manish Sisodia), आमदार राजेश ऋषी, नितीन त्यागी, प्रवीण कुमार, अजय दत्त, संजीव झा, ऋतुराज गोविंद, राजेश गुप्ता, मदन लाल आणि दिनेश मोहनिया यांना या प्रकरणाची पुढील सुनावणीसाठी २३ नोव्हेंबरपर्यंत जवाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT