देश

कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा गरीब भारतीय महिलांना बसला असून त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण त्याचबरोबर त्यांचे जेवण देखील तुलनेने घटल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॅल्बर्ग कन्सल्टिंग फर्मने केलेल्या संशोधनातून पुढे आला आहे. कोरोना संसर्गाची पहिली लाट संपुष्टात आली असताना या महिलांना पुन्हा नव्याने रोजगार मिळणे अवघड झाले आहे. मागील वर्षी मार्च ते ऑक्टोबर या काळात या अनुषंगाने पाहणी करण्यात आली होती. देशातील दहा राज्यांतील कमी उत्पन्न गटातील पंधरा हजार महिला आणि २ हजार ३०० पुरुषांची मते जाणून घेण्यात आली होती. भटक्या जमाती आणि मुस्लिम समाजातील महिलांना याचा जबरदस्त तडाखा बसला असून विभक्त आणि घटस्फोटित महिलांनाही याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे उघड झाले आहे. कामाच्या आघाडीवर पुरुषांवर मात्र फारसा ताण आलेला दिसत नाही. कोरोना काळामध्ये महिलांचे आरोग्य आणि रोजगारावर नेमका काय परिणाम झाला? याचा वेध घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.

तिची गळचेपी

आहारात घट - १० %

महिलांना मासिक पाळीचे पॅडही नाही - १६ %

गर्भनिरोधक साधने मिळाली नाहीत - ३३%

महिलांना रोजगाराची प्रतिक्षा - ४३ %

महिलांवर कामाचा भार वाढला - ४७ %

महिलांनी कोरोनाकाळात कमी विश्रांती घेतली - २७ %

आम्ही तळागाळातील लोकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पहिल्या लाटेमुळे निर्माण झालेल्या समस्यांची अनेक अंगांनी पाहणी करण्यात आली. या संसर्गाने आणखी काही महिलांच्या हातची रोजीरोटी काढून घेतली तर समाजाला मोठी किंमत मोजावी लागू शकते, यामुळे अनेक कुटुंबे कर्ज, गरिबीच्या खाईत लोटल्या जातील.

-श्‍वेता तोतापल्ली, डॅल्बर्गच्या सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: चीनच्या 'डॉल्फिन'ने रोखलेला मान्सून पुन्हा सक्रिय! मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: मोहन भागवत २५ ऑगस्टपासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT