लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली

मोठ्या आकाराचे फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर खरेदीस ग्राहकांची पसंती
लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली

पुणे : लॉकडॉऊनच्या काळात घरोघरी सर्वाधिक वापरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये रेफ्रिजरेटर, ओव्हन आणि वॉशिंग मशीनचा समावेश असल्यामुळे आता त्यांच्यात अपडेटेड व्हर्जनची खरेदी करण्याची क्रेझ आली आहे. तसेच डिशवॉशर, मोठे टिव्ही, जादा क्षमतेचे वॉशिंग मशिन्सलाही वाढती पसंती मिळत आहे. लॉकडॉऊनमुळे सुमारे २०-२५ टक्क्यांनी होम अॅप्लायसन्सेची मागणी वाढली आहे.

लॉकडॉऊनच्या काळात घरातील रेफ्रिजरेटर, ओव्हन आणि वॉशिंग मशीनचा वापर वाढल्याचे गेल्या दीड वर्षांत दिसून आले. गेल्या लॉकडॉऊनमध्ये घरेलू कामगारांना सोसायट्यांत प्रवेश नव्हता. त्यामुळे भांडी धुण्यासाठी डिशवॉशरचा खप मोठ्या प्रमाणात वाढला. तर लॉकडॉऊनमध्ये नवे खाद्यपदार्थ तयार करण्याची क्रेझ वाढली. परिणामी घरांतील नागरिकांना फ्रिज लहान वाटू लागले. तीन किंवा चार सदस्यांच्या कुटुंबासाठी पूर्वी २०० लिटर क्षमतेपर्यंतचे फ्रिज घेतले जात. आता नागरिकांकडून ४०० ते ५०० लिटरचे फ्रिज खरेदी होत आहेत. अपडेटेड कॉम्प्रेसर, डिजिटल सेन्सर आणि फास्ट कुलींगची सुविधा नव्या तंत्रज्ञानाच्या फ्रिजमध्ये मिळत आहे. तसेच 'मल्टी एअर फ्लो' मुळे संपूर्ण रेफ्रिजरेटरमध्ये खेळती हवा राहते.

लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली
MPSCच्या मायाजालात पडू नका; स्वप्निलने पत्रातून मांडली वेदना

कपडे धुण्यासाठीही ६ किलोच्या वॉशिंगमशिनऐवजी १० किलोचे वॉशिंग मशीन घेण्याचेही प्रमाण वाढते आहे. ऑटोमॅटिक व कपडे लगेच वाळतील, यावर त्यात भर दिला जात आहे. या दोन्ही मध्ये ५ स्टार असलेल्या वस्तूंना अधिक मागणी आहे. तसेच घराताच नागरिकांचा जास्त वेळ जात असल्यामुळे ३२ इंचाऐवजी ५५ इंच किंवा त्याहून मोठे टिव्ही घेण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे पिठ घरातच करण्यासाठी घरगुती गिरणीचाही खप वाढता आहे. मिक्सर- ग्राईंडर बदलण्याचेही प्रमाण मोठे आहे. अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह- ओव्हनमध्येही आता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे त्यातही अपडेटेड व्हर्जनचा वापर होऊ लागला आहे.

किंमती वाढूनही मागणी वाढली !

लॉकडॉऊनच्या काळात लोकांच्या गरजा बदलल्या. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यावर खरेदीसाठी त्यांची गर्दी उसळली. त्यामुळे या वस्तूंचे शॉर्टेजही काही काळ झाले. त्यातच उत्पादनांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. त्यातून कच्चा माल मिळेनासा झाला. परिणामी या वस्तूंच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या. तरीही या वस्तूंची मागणी कायम राहिली. आता पुरवठा साखळी सुरळीत झाली असून वस्तूंची मुबलकताही आहे. मात्र, राज्य सरकारचे निर्बंध ही ग्रहक- विक्रेत्यांची अडचण ठरली आहे.

लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली
मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी; स्वप्नीलच्या आईचा तळतळाट

''होम ॲपलायन्सेसची गरज या काळात अधोरेखित झाली. पूर्वी घऱाची गरज भागेल, अशा दृष्टिकोनातून त्यांची खरेदी होत. परंतु, या वस्तूंबाबत आता ग्राहक जागरूक झाला आहे. त्यामुळे त्यांची मागणी बदलत आहे. म्हणूनच मोठे टिव्ही, फ्रीज यांचा खप वाढला आहे.'

-अमरजितसिंग छाब्रा (महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स)

''घरेलू कामगारांवर निर्बंध असल्यामुळे लॉकडॉऊनमुळे डिश वॉशरचा खप १०० टक्क्यांनी वाढला. तर, ४००- ५०० लिटरच्या फ्रिजची खरेदी सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. घरगुती पिठाची गिरणी, मिक्सर ग्राईंडर यांचाही खप वाढला आहे. सुमारे २५ टक्क्यांनी मागणी वाढली आहे.''

- विकास बैड (डायनामिक डिस्ट्रिब्यूटर)

''ग्राहकांत सध्या आकार आणि क्षमतेने ‘मोठ्या’ वस्तू घेण्याचे प्रमाण वाढते आहे. तसेच त्यासाठी ते खर्च करण्यासही तयार आहेत. त्यासाठी वित्त कंपन्यांनीही आकर्षक योजना आणल्या आहेत. मात्र, शनिवार- रविवार मार्केट बंद राहत असल्यामुळे खरेदीची इच्छा असूनही ग्राहकांवर मर्यादा आल्या आहेत.''

- प्रीतम भळगट (प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com