Corona Update 
देश

Corona Update : शनिवारी 46,964 नवे रुग्ण; तर 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. युरोपातील काही देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट आधीपेक्षाही गंभीर मानली जात आहे. त्यामुळे त्या देशांत  पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. भारतात देखील आता पहिली लाट येऊन गेली असून कोरोनाची आकडेवारी घसरती आहे. मात्र, भारतात देखील लवकरत दुसरी लाट येईल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला  जात आहे. 

भारतात दररोज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही देशाची परिस्थिती गंभीरच आहे. सध्या देशातील कोरोना संक्रमितांची संख्या जवळपास 82 लाखापर्यंत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोना संक्रमितांची संख्या आता 81,84,082 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चोविस तासांत कोरोनाचे 45 हजारहुन अधिक रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे. यादरम्यानच्या चोविस तासांत 46,964 नवे रुग्ण भारतात सापडले आहेत. 


गेल्या चोविस तासांत 58,684 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या चोविस तासांत 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही आकडेवारी 7 जुलैनंतरची सर्वांत कमी आकडेवारी आहे. आतापर्यंत भारतात एकूण 74,91,513 रुग्ण या आजारातून सहिसलामत बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,22,111 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना संक्रमित रुग्णांची देशातील संख्या ही 6 लाखाच्या खाली आहे. 2 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ही संख्या एवढ्या खाली आली आहे. 

सध्या देशांत 5,70,458 ऍक्टीव्ह केसेस आहेत. रिकव्हरी रेटमध्येही थोडीशी सुधारणा झाली आहे. आता रिकव्हरी रेट 91.53 वर पोहोचला आहे. पॉझीटीव्हीटी रेट 4.3 टक्के आहे. तर डेथ रेट 1.49 टक्के आहे. काल एका दिवसांत 10,91,239 कोरोनाच्या टेस्ट केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत भारतात 10,98,87,303 इतक्या टेस्ट केल्या गेल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT