गॅस सिलिंडर, बँकिंग सेवेत आजपासून मोठे बदल; ग्राहकांच्या खिशाला कात्री

gas cylinder
gas cylinder

नवी दिल्ली : आज एक नोव्हेंबर. महिन्याची पहिली तारीख म्हटली की बरेच लोक अगदी खुश असतात. कारण ती बऱ्याच जणांच्या पगाराची तारीख असते. आणि खिशात पैसे येणार असतात. असं असलं तरीही ही आजची एक तारीख जरा वेगळी आहे आणि तुमची चिंता काहीशी वाढवणारी आहे. कारण, आजच्या एक तारखेला तुमच्या खिशात फक्त पैसे येणारच नाहीयेत तर ते थोडे जास्त जायला सुरवात होणारे, अशी ही तारीख आहे. कारण आजपासून काही बदल होणार आहेत, जे आपल्याला माहितच असायला हवेत, नाहीतर आपली ऐनवेळी अडचण होऊ शकते. आजपासून फ्री बँक सर्व्हीसमध्ये, रेल्वेच्या वेळापत्रकात तसेच गॅस सिलेंडरच्या बुकींग सिस्टीममध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. 

फ्री बँक सर्व्हीसमध्ये बदल
आजपासून जेंव्हा आपण बँकेत पैसे जमा कराल अथवा ते काढाल तेंव्हा आपल्याला आता त्याचे शुल्क भरावे लागणार आहे. आणि याची सुरवात बँक ऑफ बडोदा या बँकेपासून झाली आहे. बँक ऑफ इंडिया, पीएनबी, ऍक्सिस आणि सेंट्रल बँकदेखील याबाबतीत लवकरच निर्णय घेणार आहेत, असं  दिसून येतंय. मात्र, शुल्क ठरलेल्या वेळेपेक्षा बँकींग करण्यासाठीच भरावे लागतील, असं दिसतंय. बचत खात्यात जर एखाद्या कस्टमरे तीनवेळा पैसे जमा केले तर कसल्याही प्रकारचे शुल्क त्याला लागणार नाही. मात्र, चौथ्या वेळेला पैसे जमा केले गेले तर त्याला 40 रुपये शुल्क द्यावे लागतील. 

हेही वाचा - कोव्हॅक्सिन अंतिम टप्प्यात; चाचण्यांचा प्रस्ताव ‘एम्स’कडून तयार​
1 नोव्हेंबरपासून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
आजपासून सर्वप्रकारच्या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होत आहे. आधी प्रत्येक वर्षी 1 जुलैपासून रेल्वेच्या वेळेत बदल होत होता. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेच्या वेळापत्रकातील बदल  पुढे ढकलून तो आता आजपासून होणार आहे. मात्र, यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर फार फरक पडणार नाही. कारण अद्याप सामान्य रेल्वे बंदच आहेत आणि काहीच विशेष रेल्वे सुरु झाल्या आहेत. 

एलपीजी सिलेंडरच्या डिलीव्हरीसाठी आता ओटीपी असेल अनिवार्य

एलपीजी सिलेंडरच्या डिलीव्हरीच्या नियमांतदेखील बदल होत आहेत. सिलेंडर मागवण्यासाठी आता ओटीपीची व्यवस्था केली गेली आहे. ओटीपी म्हमजे वन टाइम पासवर्ड होय. हे यासाठी केलं गेलं आहे जेणेकरुन सिलेंडर कुणा चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये तसेच याचा काळाबाजारदेखील रोखता यावा. या नव्या सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटीकेशन कोड (DAC) असं नाव दिलं गेलं आहे. 

जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर डिलीव्हरी करणारा व्यक्ती एका ऍपद्वारे रियल टाइममध्ये तो अपडेट करेल आणि कोड जनरेट करेल. या व्यवस्थेमुळे त्या लोकांना त्रास होईल ज्यांचा पत्ता अथवा मोबाईल नंबर चुकीचा आहे. चुकीच्या माहीतीमुळे त्यांच्या गॅस सिलेंडरची डिलीव्हरी बंद होऊ शकते. ही व्यवस्था आता 100 स्मार्ट शहरांमध्ये लागू केली जात आहे. ही व्यवस्था कमर्शियल सिलेंडर्सना लागू नाहीये. 

इंडेन गॅसच्या बुंकीगमध्ये बदल
सामान्यत: कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढतात अथवा घटतात. मात्र, सिलेंडरच्या किंमती जूनपासून काही विशेष बदलल्या नाहीयेत. यादरम्यानच, इंडेन गॅस बुकींगसाठीच्या नंबरमध्ये बदल केला आहे. जर आपल्याला हा नवा बदल माहीत नसेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. तसंही इंडेनद्वारे त्यांच्या सर्व ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर हा नवा नंबर दिला गेला आहे. कंपनीद्वारे मॅसेज करुन कळवलं गेलं आहे की आता 7718955555 या नंबरवर गॅस सिलेंडर बुक करावा. याआधी 9911554411 या नंबरवर गॅस सिलेंडर बुक केले जायचे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com