gs bava
gs bava 
देश

दिल्लीत भाजप नेत्याच्या आत्महत्येनं खळबळ;  पार्कमध्ये घेतला गळफास

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीतील भाजप नेत्यानं घराजवळच्या पार्कमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष जी एस बावा यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पक्षाच्या नेत्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणाचा तपास पोलिस करत असून पक्षाच्या नेत्यांकडूनही काही सांगण्यात आलेलं नाही. 

जीएस बावा यांनी होळीच्या दिवशी सुभाष नगर इथं असलेल्या पार्कमध्ये ग्रीलला गळफास घेत आत्महत्या केली. 58 वर्षांचे जीएस बावा हे पश्चिम दिल्लीतील फतेह नगर इथं राहत होते. सांयकाळी जेव्हा लोक पार्कमध्ये फिरायला गेले तेव्हा बावा यांचा मृतदेह आढळला. यानंतर पार्कमधील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. मृतदेह कोणाचा आहे याबाबत लोकांना माहिती नसल्यानं ओळख पटवण्याचं काम सुरु होतं. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळी तपास केल्यानंतर मृतदेह भाजप नेते जीएस बावा यांचा असल्याचं समोर आलं. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्या नेमकी का केली याचं कारण अजुनही समोर आलेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT