Delhi Building Fire
Delhi Building Fire Esakal
देश

Delhi Fire News: दिल्लीत इमारतीला भीषण आग! पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू, पहाटेच्या सुमारास घडली घटना

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi Building Fire: दिल्लीतील भीषण आगीची घटना घडली आहे. दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका ४ मजली इमारतीला आज (ता. १४) पहाटेच्या सुमारास अचानक भाषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. मात्र, या आगीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५.२२ वाजताच्या सुमारास गीता कॉलनीतील शास्त्रीनगर, सरोजिनी पार्क गल्ली क्रमांक १३ येथील घर क्रमांक ६५ मध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक पोलीस 4 फायर इंजिन, रुग्णवाहिका आणि 3 पीसीआर व्हॅनसह घटनास्थळी पोहोचले. इमारतीत अडकलेल्या दोन मुलांसह नऊ जणांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि जवळच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

ज्या इमारतीत आग लागली ती चार मजली असून तळमजल्यावर कार पार्किंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्किंगमधून आग लागली आणि संपूर्ण इमारतीत धूर पसरला. रस्ता अरुंद असूनही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सर्व मजले शोधण्यात आले. तेथून तीन पुरुष, चार महिला आणि दोन मुलांना बाहेर काढून हेडगेवार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मृतांमध्ये मनोज (30), त्याची पत्नी सुमन (28) आणि पाच आणि तीन वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. राकेश असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला पहाटे 5:20 वाजता गीता कॉलनीजवळील शास्त्री नगरमधील एका निवासी इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने दिल्ली अग्निशमन सेवेला कळवले. घटनास्थळी पोलिसांचे पथक, 4 अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पीसीआर व्हॅन पाठवण्यात आली".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT