Arvind Kejriwal File photo
देश

कोरोमुळे अनाथ झालेल्यांसाठी केजरीवाल यांची मोठी घोषणा

सूरज यादव

नवी दिल्ली - दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या लहान मुलांचे आई आणि वडील दोघांचेही कोरोनाने (Corona) निधन झाले आहे किंवा एकाचा आधीच मृत्यू झाला असेल आणि एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन ती मुलं 25 वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. यासोबतच मुलांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

केजरीवाल यांनी घोषणा करताना असंही म्हटलं की, ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचाच कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांनाही रेशन मिळेल. प्रत्येक गरजुला महिन्याला दहा किलो रेशन मिळेल.

दिल्लीत 72 लाख लोक असे आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. सरकार अशा लोकांना पाच किलो रेशन देते. या महिन्यात अशा लोकांना मोफत धान्य दिलं जाईल. तसंच केंद्राच्या योजनेंतर्गत पाच किलो रेशन आणखी दिलं जाईल. त्यामुळे लोकांना महिन्याला 10 किलो रेशन मिळणार आहे. मात्र दिल्लीत असे अनेक लोक आहेत ज्यांना गरज आहे पण रेशन कार्ड नाही. त्यांनाही रेशन दिले जाणार आहे. दोन ते चार दिवसांत ही व्यवस्था सुरु होईल.

कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे नुकसान आपण कधीच भरून काढू शकत नाही मात्र त्यांच्या मागे असलेल्यांना मदत करू शकतो. अशा लोकांसाठी 50 लाख रुपयांची मदत केली जाईल असं केजरीवाल म्हणाले. ज्यांच्या कुटुंबातील कमावणाऱ्या प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांना 50 लाख रुपयांसह अडीच हजार रुपयांची पेन्शन दिली जाईल. तसंच पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला, ज्यांचे लग्न झालेलं नाही त्यांच्या आई वडिलांना पेन्शन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT