केरळ : कोविड लढ्यातील प्रमुख चेहरा नव्या मंत्रिमंडळातून वगळला!

कोविडविरोधी लढ्यात केरळमध्ये केलं होतं सर्वोत्कृष्ट काम
K K Shailja
K K ShailjaFile Photo

थिरुवअनंतपूरम : देशात कोरोनाची बिकट परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात केरळ राज्याचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं. इथल्या कोरोना विरोधातील लढाईतील प्रमुख चेहरा आरोग्य मंत्री के. के. शैलजा (K K Shailaja) आहेत. पण केरळमध्ये नव्यानं स्थापन होत असलेल्या सरकारमधील मंत्रिमंडळात शैलजा यांना स्थान नाकारण्यात आलं आहे. यामुळे देशभरातून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. (K K Shailaja face of Kerala fight against COVID 19 wont be part of next cabinet)

केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. त्यामुळे इथं नव्या मंत्रिमंडळाची तयारी सुरु असून त्यासाठीची यादीही तयार झाली आहे. मात्र, यामध्ये महत्वाची बाब म्हणजे जुन्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असलेले पिनरायी विजयन यांचेच स्थान नव्या मंत्रिमंडळातही कायम असेल मात्र त्याव्यतिरिक्त एकही जुन्या मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. सर्व नवे चेहरे नव्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत.

अनेक राजकीय सवाल उपस्थित

सीपीआय (मार्क्सवादी) या सत्ताधारी पक्षानं घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक राजकीय सवाल उपस्थित झाले आहेत. पण पक्षानं स्पष्ट केलंय की नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तर सीपीआयएमच्या कार्यकारी समितीनं पिनरायी विजयन यांना संसदीय दलाचा नेता निवडलं असून तेच मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.

के. के. शैलजा यांच्याकडे हीच जबाबदारी

दरम्यान, या घडामोडींवर भाष्य करताना सीपीआयएमचे नेते ए. एन. शमशीर यांनी म्हटलं की, "हा आमच्या पक्षाचा सामूहिक निर्णय असून तो सामूहिक नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे" तसेच कार्यकारी समितीनं म्हटलंय की, "आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांच्यासह सध्याच्या मंत्र्यांना हटवण्यात आलं आहे. तसेच पक्षानं एम. बी. राजेशन यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडलं आहे. तर के. के. शैलजा यांची पक्षाचे सचेतक म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय टी. पी. रामाकृष्णन यांना संसदीय पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

केरळमध्ये आरोग्य मंत्री शैलजा यांची उत्कृष्ट कामगिरी

केरळमध्ये कोरोना नियंत्रणात आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या या कामाची देशातील इतर राज्यांमध्येही खूपच चर्चा झाली होती. यापूर्वी शैलजा यांनी केरळमध्ये आलेल्या निपाह विषाणूशी लढण्यातही चांगलं काम केलं होतं. के. के. शैलजा यांनी कोरोना संसर्गादरम्यान ट्रेसिंग, आयसोलेशन आणि कन्टेन्मेट झोन तयार करण्यावर जास्त भर दिला होता, त्यांच्या या कामगिरीचं सर्वांनी कौतूक केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com