Delhi Fire Brigade esakal
देश

दिल्लीच्या गोकुळपुरीत मोठी दुर्घटना; आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली; पण..

देशाची राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी (Delhi Gokulpuri) भागात एक मोठी दुर्घटना घडलीय. रात्री उशिरा येथील झोपडपट्टीला आग लागलीय. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली..

दिल्ली अग्निशमन दलानं (Delhi Fire Brigade) दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवार) रात्री उशिरा ही घटना घडलीय. गोकुळपुरीत आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर माहिती मिळताच तात्काळ पथकं घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाला 7 जळालेले मृतदेह सापडले. दरम्यान, दिल्ली अग्निशमन विभागानं या 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. याबाबचा अधिक तपास पोलिस (Delhi Police) करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT