digital Marketing steps back to the traditional turn sakal
देश

मार्केटिंगची पावले पुन्हा पारंपरिक वळणावर

‘डिजिटल’पेक्षा जुन्या पद्धतीच्या जाहीरातींकडे ओढा वाढला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात डिजिटल युगाला सुरुवात झाल्यापासून मार्केटिंग क्षेत्रानेही त्याचा वेगाने अंगिकार केला. अनेक कंपन्यांनीही डिजिटल स्वरुपातील जाहीरातींनाच प्राधान्य देत आपला खर्च त्याकडेच वळवला. गेले सुमारे दशकभर अशी स्थिती असताना आता पुन्हा एकदा पारंपरिक जाहीरातींकडे वितरकांची पावले वळू लागली आहेत. गेली अनेक वर्षे दूरचित्रवाणी, रेडिओ, वृत्तपत्रे आणि आऊटडोअर जाहीरांतींचा सर्वत्र प्रभाव होता. सोशल मीडियाच्या उदयानंतर टिकटॉक आणि इतर डिजिटल माध्यमांकडे मार्केटिंग क्षेत्राचा ओढा वाढला.

कंपन्याही डिजिटल जाहीरातींसाठी अधिक निधी राखून ठेवू लागल्या. त्यामुळे पारंपरिक जाहीराती करणे टाळले जाऊ लागले. फेब्रुवारी २०१२ ते २०२२ या कालावधीत कंपन्यांच्या मार्केटिंगसाठीच्या निधीत सरासरी ७.८ टक्के वाढ झाली असली तरी पारंपरिक पद्धतीने जाहीराती करण्याचे प्रमाण उणे १.४ टक्के असल्याचे ‘द सीएमओ’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. मात्र, वाऱ्याची दिशा पुन्हा बदलली असून ऑगस्ट २०२१ आणि फेब्रुवारी २०२२ या महिन्यांमध्ये पारंपरिक जाहीरातींवरील खर्चात अनुक्रमे १.४ टक्के आणि २९ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. हा बदल कसा झाला, त्याची काही कारणे सांगता येतील.

डिजिटल जाहीरातींचा त्रास : ग्राहकांचा बराचसा वेळ ‘ऑनलाइन’वर जात असला तरी त्यामुळे सातत्याने स्क्रिनवर येणाऱ्या जाहीरातींकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, या जाहीरातींचा त्रास होत असल्याची तक्रारही अनेक ग्राहकांनी केली आहे. संकेतस्थळावर अथवा ॲपवर व्हिडिओ पहायचा असल्यास तो पाहण्याआधी जाहीराती दाखविल्या जातात. त्यामुळे ग्राहक त्रासतात. याउलट, अर्ध्याहून अधिक ग्राहक दूरचित्रवाणीवरील किंवा वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या जाहीराती लक्षपूर्वक पाहतात, असे ‘मार्केटिंग शेर्पा’ या संस्थेने म्हटले आहे.

ग्राहकांचा विश्‍वास : वृत्तपत्रे अथवा इतरत्र छापून येणाऱ्या जाहीरातींवर बहुतेक ग्राहकांचा (८२ टक्के) विश्‍वास असून दूरचित्रवाणीवरील जाहीरातींवरही (८० टक्के) त्यांचा विश्‍वास असल्याचे दिसून आले आहे. सर्वांत विश्‍वासार्ह जाहीरातीच्या माध्यमांमध्ये पहिल्या पाच क्रमांकावर पारंपरिक पद्धतीचीच साधने आहेत.

पॉडकास्टिंग माध्यमाचा वापर : पॉडकास्ट हा डिजीटल माध्यमाचाच भाग असला तरी हा ‘मागणीनुसार पुरवठा’ असा प्रकार आहे. त्यामुळे त्याकडे ओढा वाढत आहे.

सुयोग्य पर्याय : काही उत्पादनांसाठी, त्यांच्या ब्रँडिंगसाठी पारंपरिक जाहीराती हाच सुयोग्य पर्याय असल्याचे लक्षात आले आहे.

ग्राहकांवर भडिमार : डिजिटल स्वरुपातील जाहीरातींचा ग्राहकांवर प्रचंड भडीमार होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT