दादू : (घाईघाईने फोन करत) जय मराठी, जय महाराष्ट्र! झाली का तयारी?
सदू : (कपाळाला आठी) तयारी कसली करायची त्यात? गाडीत बसायचं, जायचं! दादर ते वरळी दहा मिनिटांचं अंतर आहे! सिग्नलवरची तीन मिनिटं पकडून!!
दादू : (उत्साहात) मी निळ्या रंगाचा कुर्ता घालीन! तू?
सदू : (उत्तर टाळत) मी हल्ली अंगावरुन शाल घेतो! आत काय घातलंय, कोण बघतंय?