indigo flight Esakal
देश

Indigo Flight: धक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाचा पुन्हा विमानात धिंगाणा, आपत्कालीन दरवाजा...

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून असभ्य वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ

अंकिता खाणे (Ankita Khane)

विमान प्रवासादरम्यान वारंवार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशांकडून विचित्र प्रकार होत असताना दिसून येत आहे. पुन्हा एकदा विमानप्रवासाच्या दरम्यान मद्यधुंद तरुणाने विमानात धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विमान प्रवासातच्या दरम्यान प्रवाशांकडून असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार पुढे येत आहेत. इंडिगो विमानामध्ये एक प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत असंच काहीस केलं त्यामुळे सर्वांनाच धास्ती लागली होती.

दिल्लीवरुन बंगळुरूला जाणााऱ्या विमानातून ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नशेच्या अवस्थेत एका 40 वर्षीय प्रवाशाने विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरूला पोहोचताना या प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आलं.

इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की विमान 6E 308 दिल्लीहून बंगळुरूला जात असताना त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद प्रवाशाचं वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड करण्यात आल्यानंतर त्याला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानात असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT