Delhi Fire: दिल्लीतील टिकरी पीव्हीसी मार्केटमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी हजर
Delhi Fire
Delhi FireEsakal

दिल्लीतील टिकरी पीव्हीसी मार्केटमधील प्लास्टिकच्या गोदामाला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. आग एवढी भीषण आहे की आगीचे लोट कित्येक किलोमीटरवरूनही दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.

Delhi Fire
Ajit Pawar Not Reachable: अजित पवार नॉट रिचेबल? पक्षातील 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना उधाण

दिल्ली परिसरात आगीच्या घटना वारंवार सुरूच आहेत. याआधी गुरुवारी रात्री देखील गोदामाला आग लागली होती. आता टिकरी पीवीसी बाजार इथे प्लास्टिक गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही.

Delhi Fire
Indigo Flight: धक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाचा पुन्हा विमानात धिंगाणा, आपत्कालीन दरवाजा...

आगीत गोडाऊन जळून खाक झाले आहेत. दुकानांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com