PM Narendra Modi Sakal
देश

मोदींच्या जम्मू दौऱ्यात घातपाताचा डाव; ड्रोनमधून फेकला बॉम्ब?

रविवारी मोदींच्या सभेच्या ठिकाणापासून जवळच स्फोट झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच रविवारी जम्मूच्या दौऱ्यावर होते. यावेळी सांबा भागातील त्यांच्या सभेजवळच एक स्फोट झाला होता. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे स्फोटकं म्हणजे आयईडी असून ड्रोनमधून ते टाकण्यात आल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Explosion in Jammu on day of PM Modi visit may have been an IED dropped by drone)

बिश्णाह भागातील ललियन गावातील ग्रामस्थांनी सांगितलं की, "हे स्फोटकं पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी तासभर आधी टाकण्यात आलं होतं. यामुळं सुरक्षा रक्षकांसाठी ही धोक्याची घंटा होती. या स्फोटकाचा मोठा स्फोट झाल्यानंतर ड्रोनच्या उडण्याचा आवाज ऐकल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. जिथं स्फोट झाला त्याजवळ राहणाऱ्या काही घरांचं नुकसान झालं आहे. घरांच्या भिंतींना तडे गेले तर खिडक्यांचा काचा देखील हादरल्या"

सुरक्षा रक्षकांतील सुत्रांच्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे स्फोटकं टाकण्यात आल्याच्या अँगलने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचा यामागे हात असू शकतो असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही संघटनांकडे ड्रोन्स उपलब्ध असल्याचंही सुरक्षा सुत्रांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाणं हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १० किमी अंतरावर होतं. त्यामुळं कट रचल्याच्या आरोपांना बळ मिळत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेवर एनएसजीकडून काऊंटर ड्रोन्स आणि बीएसएफकडून अशाच प्रकारचे अँटिड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या बालेकिल्ल्यातच ACB ची 'रेड'; महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 50 हजारांची मागणी अन् 15 हजारांत...

Pune APMC: पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा; विरोधक आक्रमक, अहवाल सादर करण्याचे आदेश!

CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

SCROLL FOR NEXT