Sharad Pawar | 'मला रात्री साडेबाराला राज्यपालांनी...', महाराष्ट्रातील राजकारणावर पवारांचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

'मला रात्री साडेबाराला राज्यपालांनी...', महाराष्ट्रातील राजकारणावर पवारांचा किस्सा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तापालट होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या ते आमदारांच्या मोठ्या गटासोबत आसामच्या गुवाहाटीत आहेत. राज्यात शिवसेना आणि पर्यायाने महाविकास आघाडी गॅसवर आहे. आमदारांना पुन्हा माघारी आणण्यासाठी सेनेच्या गोटातून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीने या बंडात सेनेच्या पाठिशी उभं राहून सत्ता वाचवण्याचा पवित्रा घेतलाय. सध्या शरद पवार हे सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर भाजपने पुन्हा राज्यपालांकडे धाव घेतली आहे. राज्यपालांना पत्र लिहून भाजपने सरकारच्या कामात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. (Maharashtra Politics)

दरम्यान, २५ एप्रिलला शरद पवारांनी एका राजकीय प्रकरणात फडणवीसांना टोला लगावला होता. काही लोक सत्ताा गेल्यामुळे अजून अस्वस्थ आहेत. निवडणुकीआधी त्यांनी मी येणार असं म्हटलं होतं. मात्र तसं न झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे, असं म्हटलं. (Sharad Pawar)

राणांनी पुकारलेल्या हनुमान चालिसा पठणानंतर, मुख्यमंत्र्यांचं एकेरी नाव घेऊन वेडंवाकडं बोलणं शोभत नसल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली. यावेळी त्यांनी ८० च्या दशकातील त्यांचा एक किस्साही शेअऱ केला. तसेच बाळासाहेबांसोबतचे संबंध अधोरेखित केले. (Sharad Pawar Latest News)

हेही वाचा: शरद पवार - देवेंद्र फडणवीस पुण्यात 'एकाच' व्यासपीठावर !

'रात्री साडेबाराला सत्ता गेली...सकाळी मी वानखेडेवर मॅच बघत बसलेलो'

माझी कैकदा सत्ता गेली. ८० साली माझं सरकार बरखास्त केलं. मला रात्री साडेबाराला राज्यपालांनी याची माहिती दिली. मी त्यानंतर लगेच घरातील सामान आवरून दुसऱ्या जागेत राहायला गेलो. सरकारी जागा सोडली.

यानंतर सकाळी दहाला इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट सामन्यासाठी वानखेडेवर गेलो. आणि दिवसभर मॅच एन्जॉय केली. हल्ली काही लोक सत्ता गेल्यानंतर फार अस्वस्थ आहेत. मी त्यांना दोष देऊ शकत नाही. मी येणार अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. पण तसं घडू शकलं नाही.

राष्ट्रपती राजवट लागणार चर्चा केली जाते. अशी भाजपवाले दमदाटी करतात. त्याचे परिणाम होत नाहीत. राज्यात मध्यावधी निवडणूक लागली की त्याचे परिणाम काय होतात, हे कोल्हापूरने दाखवून दिलं आहेय त्यामुळे त्या टोकाला जाईल अस मला वाटतं नसल्याचं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा: 'काश्मीर फाईल्सला नावं ठेवणारे शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट' - विवेक अग्निहोत्री

विजेच्या प्रश्नावर बाबासाहेबांची दूरदृष्टी हवी

आज महाराष्ट्रात विजेची कमतरता जाणवत आहे. याबद्दल चर्चा केली जातेच आहे पण स्वातंत्र्यच्या आधी जे सरकार होतं तिथे बाबासाहेब विद्युत मंत्री होते. काही धोरणात्मक निर्णय त्यांनी त्या काळात घेतले होते.

विद्युत निर्मिती पाण्याच्या माध्यमातून केला हा त्यांच्या काळात झाला. बाबासाहेब यांनी पॉवर ग्रीड म्हणजे एका राज्यात मधून दुसऱ्या राज्यात वीज नेण्यासाठीचा निर्णय घेतला होता. बाबासाहेब यांच्याकडे महसूल खाते होते तेव्हा मजूरांसाठी त्यांनी कायदे आणले, असं शरद पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar Speaks On President Rule In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad Pawar
go to top