Crime News esakal
देश

Crime News : अपमानाचा घेतला बदला; चालकाचा बाप-लेकानं केला गळा दाबून खून, मृतदेह एक्स्प्रेस वे'वर दिला फेकून

सोंबीरचा गळा दाबल्यानंतर आरोपींनी एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या नाल्याजवळ मृतदेह फेकून दिला.

सकाळ डिजिटल टीम

सोंबीरचा गळा दाबल्यानंतर आरोपींनी एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या नाल्याजवळ मृतदेह फेकून दिला.

Crime News : नूह येथील कुंडली-मानेसर-पलवल (KMP) एक्स्प्रेस वेजवळ 35 वर्षीय ड्रायव्हरचा खून केल्याप्रकरणी पिता-पुत्र दोघांनाही अटक करण्यात आलीये.

पोलिसांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान आरोपींपैकी एकानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडितेनं त्याच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. 29 डिसेंबर रोजी तौरु पोलीस स्टेशनला (Tauru Police Station) KMP जवळील नाल्यात एक मृतदेह पडल्याचा फोन आला. पीडित सोंबीर (Sombir) हा मूळचा भिवानी येथील बिर्ही खुर्दचा रहिवासी आहे. काका राज सिंग यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

28 डिसेंबर रोजी आरोपी गुडगावच्या वजीरपूर इथं गेले, तिथं त्यांनी सोंबीरला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि मारहाण केली. सोंबीरचा गळा दाबल्यानंतर आरोपींनी नूह इथं एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या नाल्याजवळ मृतदेह फेकून दिला, असंही पोलीस म्हणाले. तौरु पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरेश कुमार आणि त्याचा मुलगा राजकुमार यांना रविवारी उत्तर प्रदेशातील मथुरामधील गावातून अटक केली.

फिर्यादीत म्हटलंय, सोंबीर हा वजीरपूर येथील एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मात्र, काही दिवसांपासून तो मूळ घरी परतला नव्हता. कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह नुह इथं फेकून दिल्याचा संशय फिर्यादीनं व्यक्त केला. त्यानुसार तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT