Air India च्या विमानात मद्यधुंद व्यक्तीचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

एअर इंडियाच्या विमानात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

Air India च्या विमानात मद्यधुंद व्यक्तीचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघवी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात (Air India Aircraft) एक लाजिरवाणी घटना समोर आलीये. एका मद्यधुंद व्यक्तीनं महिला प्रवाशावर लघवी केलीये. ही महिला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती.

हेही वाचा: Sangli : छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात पुतळा हटवला; आंदोलकांची पोलिसांशी झटापट, 30 जणांना अटक

त्यानंतर पीडित महिलेसोबत बसलेल्या एका व्यक्तीनं तिच्या अंगावर लघवी केली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये (Air India Business Class) एका महिलेच्या अंगावर लघवी केल्याची घटना 26 नोव्हेंबरची आहे. ही पीडित महिला न्यूयॉर्कहून दिल्लीला जात होती. आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय, घटनेनंतर अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली असून आरोपी पुरुष प्रवाशाला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे प्रकरण आता सरकारी समितीच्या अखत्यारीत असून निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :delhiAir IndiaNew York