Five crore pending cases in country Minister of Justice Kiren Rijiju aurangabad  sakal
देश

देशात पाच कोटी प्रलंबित खटले : किरेन रिजिजू

दीक्षांत समारंभ : दिवसात ५० खटल्यांची सुनावणी; निकालाच्या गुणवत्तेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘‘देशाचे विधी व न्यायमंत्री म्हणून मी शपथ घेतली, त्यावेळी चार कोटी खटले प्रलंबित होते, आता तो आकडा पाच कोटींपर्यंत गेला. ब्रिटन, अमेरिकेत दिवसाला साधारणतः: तीन ते चार खटले सुनावणीस घेतले जातात. मात्र, आपल्या देशात हीच संख्या ४० ते ५० आहे. त्यामुळे निकालाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे,’’ असे मत केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पहिल्या दीक्षांत समारंभात शनिवारी (ता. ९) झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व विद्यापीठाचे कुलपती ए. एम. खानविलकर, न्यायाधीश व विद्यापीठाच्या महासभेचे सदस्य ऋषिकेश रॉय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व विद्यापीठाचे उपकुलपती दीपांकर दत्ता, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. एस. सरमा आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश सुजाता मनोहर,निवृत्त न्या. रंजना देसाई, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अरविंद सावंत यांना मानद एल.एल.डी प्रदान करण्यात आली. रिजिजू म्हणाले, ‘‘वाढत्या खटल्यांमुळे काही प्रकरणे लवादात मिटवावीत. त्यानंतर महत्त्वाचे खटलेच दाखल करून घ्यावेत, असे न्यायाधीशांना सांगितले आहे. लवादासाठी पावसाळी अधिवेशनात ‘मिडीएशन लॉ’ आणत आहोत. काही वकील मोफत खटला लढतात मात्र, काहींचे शुल्क सामान्यांना परवडणारे नसते. न्यायापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहू नये, ही आपली भूमिका असली पाहिजे.’

कुठल्या रांगेत बसायचे ते ठरवा वकिली क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराला भेट द्यावी, तिथे प्रेरणा मिळेल, असे किरेन रिजिजू म्हणाले. एलएलबी शिक्षणावेळच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, माझ्या वर्गात तीन रांगा होत्या. पहिल्या रांगेतील न्यायाधीश झाले. दुसऱ्या रांगेतील प्रसिद्ध वकील झाले. तिसऱ्या रांगेतील माझ्यासारखे राजकारणी होतात! त्यामुळे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे की, आपल्याला कुठल्या रांगेत बसायचे आहे.

पदवी, पदव्युत्तरसह पदके

दीक्षांत समारंभात ५८ विद्यार्थ्यांना बीएएलएलबी आणि ६७ विद्यार्थ्यांना एलएलएम पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मनस्वी शर्मा यांनी सुवर्णपदक तर, ऐश्‍वर्या पांडे यांनी रौप्यपदक पटकावले.

औरंगाबाद की संभाजीनगर

‘‘मी शहरात आल्यावर काही लोक सांगत होते, की शहराचे नाव बदलले आहे. त्यामुळे औरंगाबाद म्हणू की संभाजीनगर, अशा संभ्रमात मी आहे. महाराष्ट्रातील आधीच्या सरकारने शहराचे नाव बदलले आहे. मात्र, अधिसूचना नसल्याने मी औरंगाबादच म्हणेन, अशी कोपरखळी रिजिजू यांनी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान...मतदार यादीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?

'ते माझ्या मागे होते, मी जोरात पळत सुटलो आणि...' दिलीप प्रभावळकरांना स्वत:च वाटलं कौतूक, म्हणाले...'वयाच्या 80 व्या वर्षी...'

Video : मुंबई लोकलमध्ये चाकरमान्यांनी दादागिरी; 'दोन्ही सीट आमच्या' म्हणत प्रवाशांसोबत केलं धक्कादायक कृत्य, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Rahul Gandhi : चीनने जमीन हडपली कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर हे बोलला नसतात, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Ind vs england 5th Test : ''आजच्या काळात अशा चुका परवडणाऱ्या नाहीत''; आर. अश्विनने गिलच्या चुकांवर ठेवलं बोट,संघाच्या रणनीतीवर व्यक्त केली तीव्र नाराजी...

SCROLL FOR NEXT