Ashwin Criticizes Shubman Gill's Captaincy : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा अंतिम सामना ओव्हल मैदानावर खेळावला जातो आहे. या सामन्याचा आज शेवटचा दिवस असून इंग्लडला विजयासाठी केवळ ३५ धावांची गरज आहे. तर भारताला ४ गडी बाद करावे लागणार आहेत. मात्र, या सामन्यातील भारताच्या रणनीतीवर आता माजी फिरकीपटू आर. अश्विनने नाराजी व्यक्त केली आहे.