
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी केलेल्या विधानावरून सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे. भारतीय लष्कराबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर अब्रूनुकसानीचा दावा करण्यात आला होता. याला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने सुनावणीवेळी राहुल गांधींनाच सुनावलं असून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, चीनने २००० किमीपर्यंत भारताची जमीन हडप केली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर असं बोलला नसता.