four terrorist gunned down by security forces at jammu kashmir
four terrorist gunned down by security forces at jammu kashmir 
देश

काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा भागात गुरुवारी संध्याकाळी शोधमोहीम राबवली जात असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शुक्रवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, शोपियाँ जिल्ह्यातील मोलू-चित्रगाम भागात 3 जून रोजी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. तर 31 मे रोजी झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार झाले होते तर एक जवान जखमी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT