Supreme Court  E sakal
देश

Godhra Case : साबरमती एक्सप्रेस आग प्रकरणातील आठ दोषींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

रवींद्र देशमुख

गुजरात : गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या सर्व दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने चार दोषींना जामीन देण्यास नकार दिला. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले.

सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने गोध्रा प्रकरणातील दोषींच्या जामीन प्रकरणावर निर्णय दिला. जामीन मिळालेले 8 दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

जामिनाच्या अटी पूर्ण करून उर्वरित लोकांना जामिनावर सोडण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. दोषींचे वकील संजय हेगडे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामिनावर सोडण्याचे आवाहन केले.

2002 मध्ये गोध्रा साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ५९ जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहिम गड्डी यांच्यासह 27 दोषींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

गुजरात सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, हे केवळ दगडफेकीचे प्रकरण नाही. गुन्हेगारांनी साबरमती एक्सप्रेसची बोगी बाहेरून बंद केली होती. त्यानंतर आग लावण्यात आली. त्यात ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT