I will be back in three years to inaugurate plant PM Modi says in Odisha
I will be back in three years to inaugurate plant PM Modi says in Odisha 
देश

तालचर प्रकल्पाच्या उद्घाटनाला मीच येईन : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि याच्या उद्घाटनाला मीच येईन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी ओडिशामध्ये विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ओडिशातील बिजू जनता दलावर आरोप करत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,खत निर्मितीच्या कारखान्यावर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2000 मध्ये तालचर खत निर्मितीच्या कारखान्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा कारखाना धूळ खात पडून होता. अधिकाऱ्यांनी 36 महिन्यात या कारखान्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 36 महिन्यांनी मी या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, गोरखपूर, झारखंड, तेलंगाणामधील सरकारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT